श्रावणात दाजी प्रभू मिराश्यांची वरसल सुरू झाली आणि ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लागलं. दत्तंभट सालाबाद प्रमाणे सकाळीच पूजा साहित्य घेवून एकादष्णी करायला देवळात गेले. बळाणीवर सामान ठेवून गाभाऱ्या बाहेरची कळशी घेऊन विहीरीवर गेले. विहीर म्हणजे छोटेखानी तळंच होतं. सहा हात औरस चौरस घडीव चिऱ्याच चौकोनी बांधकाम केलेली ती विहीर कायम तोंडोतोंड भरलेले असायची. पावसाळी उमळं फुटल्यावर अगदी माघापर्यंन्त उगवतच्या बाजूने छिनेलानी बांधलेल्या हातभर रुंद आणि ढोपरभर खोल पाटातून व्हावटीचं पाणी सदू लिंगायताच्या गोठ्यामागच्या व्हाळीत जात असे. पाऊसकाळात दर्शनाला येणारी माणसं त्या पाटातच हातपाय धुवून मग देवदर्शनाला जात असत. दत्तंभटाने हातपाय धुवून कळशी घेवून देवळात गेले. मुकटा नेसून पंचाचा पिळा बळाणीवर ठेवून पूजा साहित्य घेवून ते गर्भागाराच्या चौकात गेले. गाभाऱ्या समोरच्या नंदीवर कळशीतलं पाणी ओतून मागे जावून ताजी कळशी भरून आत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गाभाऱ्याला कुलूप घातलेलं आहे. गेली पन्नास वर्षं श्रावणातल्या दर सोमवारी आणि वर्षभरात अधेमधे ते एकादष्णी करायला ईश्वराच्या देवळात यायचे. पण त्यांच्या आठवणीत आज प्रथमच गाभाऱ्याला कुलूप अघून ते थक्क झाले.
जया देव तारी - भाग 1
जया देव तारी - भाग ०१ श्रावणात दाजी प्रभू वरसल सुरू झाली आणि ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप लागलं. दत्तंभट सालाबाद प्रमाणे सकाळीच पूजा साहित्य घेवून एकादष्णी करायला देवळात गेले. बळाणीवर सामान ठेवून गाभाऱ्या बाहेरची कळशी घेऊन विहीरीवर गेले. विहीर म्हणजे छोटेखानी तळंच होतं. सहा हात औरस चौरस घडीव चिऱ्याच चौकोनी बांधकाम केलेली ती विहीर कायम तोंडोतोंड भरलेले असायची. पावसाळी उमळं फुटल्यावर अगदी माघापर्यंन्त उगवतच्या बाजूने छिनेलानी बांधलेल्या हातभर रुंद आणि ढोपरभर खोल पाटातून व्हावटीचं पाणी सदू लिंगायताच्या गोठ्यामागच्या व्हाळीत जात असे. पाऊसकाळात दर्शनाला येणारी माणसं त्या पाटातच हातपाय धुवून मग ...Read More