कोंदण पर्व एक

(1)
  • 165
  • 0
  • 1.1k

एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची पाऊल चढायची, अन ओसरली कि, सूर्य उगवल्यासारखी टाच उघडी टाकत तळव्याखालून वाळू ओढून न्यायची... कित्येक वर्ष ते स्वप्न मी पाहिलंय.. पण.. कधी? ती सोबत असताना.. तिने टाकलं मला तेव्हा.. तेव्हा माझ्या आयुष्यातून बाहेर पडलं ते पाऊल.. आता स्वप्नात फक्त रेतीवरचा खोल ठसा येतो.. पण तो ठसा जातानाचा दिसतोय.. परतीचा नाही.. मी वाट पाहतोय आता.. तो परतीचा ठसा उमटण्याची... आणि.. पराकाष्ठा करतोय तो परतीचा ठसा उमटेल, तोवर तिच्यासाठी जीव जगवत जगण्याची..

1

कोंदण पर्व एक - भाग 1

समर्पण मैत्री अन प्रेमातलं.. 🍁🍁 ...Read More

2

कोंदण पर्व एक - भाग 2

सुनी तशी जगन्मित्र होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. ती त्यांची लीडर असल्यासारखीचं वावरायची. सगळ्या तिच्या मागे मागे. त्यावेळी मुलींना वैगरे असण्याचा प्रकार तसा अपवादात्मक असायचा. मी सुनीच्या आयुष्यातला अपवाद होतो. ती माझ्याशी तितकीच मोकळी असायची जितकी एखाद्या मैत्रिणीशी. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कि, मी तिचं सगळं ऐकायचो. स्वतःची बुद्धी स्वतःसाठी फार न वापरता. तीने सांगितलेलं करण्यात खर्ची घालायचो.शिवाय घराजवळ रहात असल्यामुळे अगदी बालवाडीपासूनच आम्ही एकत्र होतो. पण मोठे होत चाललो तरीही आमच्यातल्या लिंगभेदाने आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आणला नाही. उलटं तो बंध एकमेकांच्या संगतीमुळे आणखी दृढ होत गेला.त्या वर्षी सातवीच्या परीक्षा संपून निकाल लागला. मला आठ्याहत्तर ...Read More

3

कोंदण पर्व एक - भाग 3

राम: रामौ रामा: प्रथमारामन रामौ रामान द्वितीया...अशा तर्हेने आमचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. ती सुभाषिते पाठ करने, रूपं चालवणे. परस्मैपद, उभयपद यातली अंतरे. त्या सुंदर भाषेच व्याकरण बारिकशा क्लिष्ट अशा नक्षीत घडवलेल्या दागिण्यासारखेच क्लिष्ट होते. ते पुस्तक नुसतंच वाचणं म्हणजे सुद्धा जिभेला कवायत होती. तिथं पाठांतर वैगरे डोक्याला ताप होत होता. आणि संस्कृतला पाठांतरशिवाय पर्याय नाही हे माहित होतं. हौसेच रूपांतर जराशा त्रासात झालेलं मी पहिल्यांदा अनुभवत होतो. मला त्याची भीतीच वाटू लागली पहिल्यांदा.मग नेहमीप्रमाणे मी सुनीशी या विषयावर बोललो." सुने संस्कृत घेतलं तर खरं. पण एवढी सोपी, खायची गोष्ट वाटत नाहीये ग. कायच्या काय नियम आहेत त्यां भाषेला. ...Read More

4

कोंदण पर्व एक - भाग 4

" परत असला प्रकार घडला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. हुशार आणि गुणी मुलगी म्हणून नाव आहे तुमच्या तिने असं वागावं असं अपेक्षित नाहीये. त्या मुलाच्या आई वडिलांना झाला प्रकार व्यवस्थितपणे सांगितला आहेच आम्ही. पण तुम्ही सुनेत्राला देखील समजावून सांगा. परत हे क्षम्य नसेल. " प्राचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये माझे वडील आणि सुनीचे वडील आमच्यासमोर उभे राहून प्राचाऱ्यांची बोलणी खात होते.पहिल्यांदाच तक्रार ऐकण्यासाठी तिच्या बाबांना बोलवण्यात आलं होतं. कारणं सुनीने प्रकारच असा केला होता. तिच्याकडून अशी कृती माझ्या कल्पनेपलीकडची होती... शिवाय.. ते तिने केलं त्याला कारण मी होतो... सुनीने क्षणात माझ्या मनातल्या भीतीचे निराकरण केले होते. माझ्या इतकं महत्वाचं तीला ...Read More