पडद्याआडचे सूत्रधार

(0)
  • 270
  • 0
  • 345

जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत सजीव यांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू.

1

पडद्याआडचे सूत्रधार - 1

जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत सजीव यांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू. ...Read More

2

पडद्याआडचे सूत्रधार - 2 - गुरूचे चंद्र आणि मंगळाकडे प्रयाण

आता ते आयओच्या दिशेने जातं होते. हा गुरु ग्रहाचा तिसरा सर्वात मोठा चंद्र आहे. जसजसे त्याच्या जवळ ते जाऊ त्यांना त्या चंद्राची जास्त ओढ वाटू लागली. आतापर्यंत सगळीकडे नुसता बर्फच त्यांना दिसला होता पण या चंद्रावर त्यांना फक्त आणि फक्त जागृत ज्वालामुखी दिसत होते. सतत त्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी लावा औकात होते. ते आता आयओपासून ५०० किमी उंचीवर उडत होते. आणखी जवळ गेल्यावर त्यांच्या तबकडीच्या बाहेर असलेल्या तापमान मोजणाऱ्या यंत्रणांनी अचानक उच्च तापमान दाखवले. लगेचच दुसऱ्या यंत्रणाने विषारी वायू असल्याची माहिती दिली. शोध घेतल्यावर असे निदर्शनास आले की आयओच्या पृष्ठभागावरचे ज्वालामुखी ५०० किमी उंच लाव्हा, राख आणि विषारी वायू फेकत ...Read More