जे लोक अनेक समस्यांनी त्रासलेले असलेले असतात, ज्याना पैसे कमी पडत असतात किंवा ज्यांना कोणत्याही कारणांनी भगवंताविषयी जिज्ञासा उत्पन्न होते असे लोक भक्ती मार्गात पाऊल ठेवतात. भगवंताविषयी ज्ञानाचा प्रसार तसेच नामाचा प्रसार करणारे भगवंताला प्रिय असतात.
श्रीमद् भागवत - भाग 1
श्रीमद् भागवत -१जे लोक अनेक समस्यांनी त्रासलेले असलेले असतात, ज्याना पैसे कमी पडत असतात किंवा ज्यांना कोणत्याही कारणांनी भगवंताविषयी उत्पन्न होते असे लोक भक्ती मार्गात पाऊल ठेवतात.भगवंताविषयी ज्ञानाचा प्रसार तसेच नामाचा प्रसार करणारे भगवंताला प्रिय असतात.जे लोक सतत काही वासना, इच्छांच्या मागे लागून भोग विलास करण्यात मग्न असतात आणि नंतर सुख मिळत नसल्यामुळे दुःखी होत असतात, आपल्या इंद्रीय सुखासाठी कोणत्याही थराला जाऊन चुकीची कामे करण्यात मग्न झालेले असतात , आणि त्यामुळे त्यांना दुःख, संकटांना सामोरे जावे लागते. ज्ञान असूनही भगवंता बद्दल नीट आकलन झालेले नसल्याने जे दुःखी राहतात. तसेच काही लोक स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे असतात, गैर कृत्य करण्यात ...Read More
श्रीमद् भागवत - भाग 2
श्रीमद्भागवत पुराण: महर्षी व्यासांची सर्वश्रेष्ठ भक्ती-रचनाभारतीय आध्यात्मिक साहित्यात श्रीमद्भागवत पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रंथाची निर्मिती, त्याचा उद्देश आणि परीक्षित यांचा उद्धार ही कथा मानवी जीवनाला दिशा देणारी आहे. महाभारताची रचना केल्यानंतरही महर्षी व्यासदेवांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती. त्यांनी वेदांचे वर्गीकरण केले, पुराणे लिहिली आणि महाभारतासारखा जगातील सर्वात मोठा इतिहास लिहिला, तरीही त्यांना आत्मिक शांती लाभत नव्हती.नारद मुनींचे मार्गदर्शन आणि व्यासांची व्याकुळताव्यासदेव जेव्हा सरस्वती नदीच्या काठी चिंतेत बसले होते, तेव्हा तिथे देवर्षी नारद प्रकट झाले. व्यासांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, "हे व्यासदेव, तुम्ही महाभारतात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थांचे वर्णन केले. ...Read More