नमस्कार! मी अक्षय वरक. आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन भरून आलं. त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच... ...पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय "पत्रकार धोंडीराम धोत्रे" — थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका! या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1
नमस्कार! मी अक्षय वरक.आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन आलं.त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच......पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय"पत्रकार धोंडीराम धोत्रे" —थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका!या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!आजचा भाग 1 आहे – या प्रवासाची पहिली पायरी. तुम्ही ...Read More
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 2
भाग ०१ : वाड्याची दंतकथा"माझं पोट... साफ होत नाही."हो, हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल, ‘काय बुवा, ह्याचं आरोग्य बिघडलंय वाटतं!’पण माझ्या तब्येतीचं नव्हे तर पद्धतीचं वर्णन आहे. कारण माझं पोट म्हणजे साधं पचन यंत्र नव्हे...ते एक 'ब्रेकिंग न्यूज सेन्सर' आहे!मी धोंडीराम. तोडफोड दैनिक मधला फुकटातला वार्ताहर. आई नाही, बायको नाही. जेवायला मिळालं तर बघतो, नाही मिळालं तर बातमी खातो.माझं पोटही याच शिस्तीचं . काहीतरी 'खाद्य' आलं की हळूहळू पचवायला घेतं... पण बातमी जवळ आली की?सगळं अडकतं. थांबतं. गडबडतं.एक गंमत सांगतो. जेव्हा माझ्या पोटात अकारण वळवळ सुरू होते ना...तेव्हा मी डॉक्टरकडे जात नाही, मी नगरपालिकेकडे जातो! कारण ती वळवळ म्हणजे नक्की ...Read More
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 3
“कोण जातो इथे?” – त्या टॉर्चवाल्याने कडक आवाजात विचारलं.प्रकाशाचा झोत थेट माझ्या डोळ्यांवर आला, आणि काही क्षण मी गोंधळलो. त्या प्रकाशाआडून जेव्हा चेहरा स्पष्ट दिसू लागला, तेव्हा मी पटकन ओळखलं –तो गण्याचा मामेभाऊ संत्या होता. “© 2025 Akshay Varak – All rights reserved”)हो, हाच तो संत्या. जो लहानपणी संध्याकाळी भजन म्हणता म्हणता चुकून स्वतःलाच झपाटल्यासारखं वागायला लागला होता... आणि गावात त्याला तेव्हापासून "झपाटलेला संत्या" म्हणून ओळखू लागले.त्याच्या हातात एक जुनी काळपट टॉर्च होती. जी चालू ठेवण्यासाठी मधेच झटकावी लागते.तो तीच टॉर्च शेजारच्या पायरीवर आपटत होता, कारण कधीकधी ती जास्त प्रकाश देण्याऐवजी धूर काढते.त्याच्या चेहऱ्यावर मात्र ती टॉर्च नव्हे तर ...Read More
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 4
भाग ३ : रात्रीची मोहीमगावातलं सायंकाळचं शांत वातावरण काहीतरी कुजबुजतं होतं. पक्ष्यांनी झाडांवर बसून गोंधळ घालणं थांबवलं होतं, आणि फक्त झाडांच्या फांद्यांमधून वारा ‘हश्श… हश्श…’ करत वाजवत होता. भिकू काकांनी सांगितलेल्या गोष्टी पुन्हा एकदा मनात पुटपुटल्या . रमाबाईचं ओलं भूत, पायांशिवाय साडीतील बाई, आणि टपटप टपकणारं कुंकू!माझ्या पोटातली बातमीभूक जोरात चिवचिवायला लागली. एका बाजूला मन म्हणत होतं, “धोंडीराम, इतकं काय विचार करतोयस? एक चहाचा कप घे आणि घरी झोपी जा.”पण दुसऱ्या बाजूने पत्रकार म्हणून जो आत्मा माझ्यात अडकून बसलाय, तो ओरडत होता. “चहा राहू दे! तुझं नाव ‘धोंडीराम भिताडे’ आहे की ...Read More
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 5
भाग ४ : सत्याचा उलगडा"‘रमा – १८२२, श्रावण पौर्णिमा’…! हंss! त्या तांब्यावर कोरलेलं नाव आणि तारखेनं तर माझ्या झोपेचं वाजवले. जणू माझं डोकंच त्या तांब्यासारखं रिकामं झालं होतं. पण आतून रहस्यमय धातूने भरलेलं! रात्रभर मी उशाशी तो तांबं ठेवून झोपायचा प्रयत्न केला, पण काय सांगू? प्रत्येक वेळी डोळा लागला की वाटायचं. एखादी साडी नेसलेली, केस मोकळे केलेली बाई येतेय आणि म्हणतेय, 'धोंडीराम, मला शोध… मी श्रावणात हरवलेय!'आता बघा, तांबं हातात घेतल्यापासून माझ्या विचारांचं चक्रीवादळ उठलं होतं. पाण्याचा आवाज ऐकला की वाटायचं, कुणीतरी विहिरीतून 'हेलो!' म्हणतंय. सावली दिसली की वाटायचं, 'ही ...Read More