नमस्कार! मी अक्षय वरक. आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन भरून आलं. त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच... ...पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय "पत्रकार धोंडीराम धोत्रे" — थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका! या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1
नमस्कार! मी अक्षय वरक.आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन आलं.त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच......पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय"पत्रकार धोंडीराम धोत्रे" —थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका!या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!आजचा भाग 1 आहे – या प्रवासाची पहिली पायरी. तुम्ही ...Read More
पत्रकार धोंडीराम धोत्रे - 2
भाग ०१ : वाड्याची दंतकथा"माझं पोट... साफ होत नाही."हो, हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल, ‘काय बुवा, ह्याचं आरोग्य बिघडलंय वाटतं!’पण माझ्या तब्येतीचं नव्हे तर पद्धतीचं वर्णन आहे. कारण माझं पोट म्हणजे साधं पचन यंत्र नव्हे...ते एक 'ब्रेकिंग न्यूज सेन्सर' आहे!मी धोंडीराम. तोडफोड दैनिक मधला फुकटातला वार्ताहर. आई नाही, बायको नाही. जेवायला मिळालं तर बघतो, नाही मिळालं तर बातमी खातो.माझं पोटही याच शिस्तीचं . काहीतरी 'खाद्य' आलं की हळूहळू पचवायला घेतं... पण बातमी जवळ आली की?सगळं अडकतं. थांबतं. गडबडतं.एक गंमत सांगतो. जेव्हा माझ्या पोटात अकारण वळवळ सुरू होते ना...तेव्हा मी डॉक्टरकडे जात नाही, मी नगरपालिकेकडे जातो! कारण ती वळवळ म्हणजे नक्की ...Read More