पापक्षालन

(3)
  • 4.2k
  • 0
  • 1.4k

“अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावे खाऊ लागले. जहाजाचा कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा अवधी गेल्यावर एका हशमाला मी खूण करुन जवळ बोलाविले. तो येताच काही न बोलता मूठ उघडली. मुठीतचमकणाऱ्या दोन सुवर्णमुद्रा पाहून त्याचे नेत्र चमकले.”

1

पापक्षालन - भाग 1

पापक्षालन भाग 1 “अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावेखाऊ लागले. कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा ...Read More

2

पापक्षालन - भाग 2

पापक्षालन भाग 2इतिहासात झालेल्या घनघोर लढाया आणि यावनी सेनेचे हल्ले यामध्ये फार फार अंतर होते. साधन शुचितेचे ताळतंत्र नसलेले यावनी हल्लेखोर! पादाक्रांत केलेल्या भागातील प्रजेवर अनन्वित अत्याचार त्यांनी केले. वृद्ध, बालके, स्त्रिया यांची निर्घृण कत्तल केली. स्त्रियांवर अत्याचार केले. मार्गातील मंदिरे, पाठशाला, विजयस्तंभ, शिलालेख, धर्मस्थळे, गुरुकुले,स्वागत कमानी उद्ध्वस्त करीत, सक्तीने धर्मांतरे करीत महान संस्कृतीची राखरांगोळी करीत हल्लेखोर मुसंडी मारीत विभवेच्या सीमेवर आले. सीमावर्ती भागातील प्रजाजनांवर होणाऱ्या अत्याचारांची वर्णने ऐकून मेघवत्साना अन्न गोड लागेना. या परचक्रात विभवेचे साम्राज्य अस्तंगत होणार असे भाकित राज ज्योतिषानीही वर्तविले. हल्लेखोरांच्या एक एक कारवाया एोकून महाराजांच्या काळजाचे पाणी झाले. धर्मभंजक, संस्कृती ...Read More

3

पापक्षालन - भाग 3

पापक्षालन भाग 3 पित्याचे कथन ऐकून प्रभावित झालेल्या तेजदत्तानी थरथरत्या आवाजात प्रतिज्ञा केली, विभवेच्या राजघराण्यातील हा शेवटचा वंशज महाप्रतापी आणि साक्षातपरब्रह्मस्वरुप आचार्यांच्या साक्षीने प्रतिज्ञाबध्द आहे. विभवेवर चंद्रवंशीयांचा राजध्वज फडकविणे हे आमच्या जीवनाचे परम प्राप्तव्य राहील. वाटेल ते अग्निदिव्य करुन आम्ही ते साध्य करु अथवा आत्माहुती देऊ. आम्हाला शत्रूच्या कचाट्यातून सोडविणाऱ्या डोंगा भिल्लाच्या स्मरणार्थ विभवेच्या मुख्य चौकात स्तंभ उभारु हाआमचा पण आहे. ‘‘ द्रविड प्रांतात आल्यापासून दीड तपांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच महाराजांच्या मुखावर समाधानाची छटा दिसली. आपला शौर्यबिंदू घेऊन वाढलेले, आचार्यांच्या संपन्न संस्कारांनी समर्थ झालेले तेजदत्त ! विभवे वरील अमंगल सावट दूर करण्यासाठी ते प्रतिज्ञाबध्द झाले. आपल्या जन्माचे सार्थक ...Read More

4

पापक्षालन - भाग 4

पापक्षालन भाग 4तत्पूर्वी महाराज आणि आचार्य यांची भेट घेणे निकडीचे होते. सेवक वर्गाच्या ताफ्यातून कटूभिल्ल, महाराजांच्या सेवेतील राजनिष्ठ घराण्यांपैकी यांचे वंशज अशी नेमकी मंडळी घेऊन तेजदत्त थिरुकोट्टाला रवाना झाले. कटू भिल्लाला पाहताच महाराजांना दुःखावेग आवरेना.तेजदत्तांच्या कर्तृत्वाची साक्ष त्यांना पुरेपूर पटली. आचार्यांसमोर अधोवदन तेजादत्तांना महाराज म्हणाले, “दत्त! आचार्यांचे पदवंदन करा.” लज्जित झालेले तेजदत्त कापऱ्या स्वरात म्हणाले, “हा देह अपवित्र आहे महाराज... .. . . . .” “वारांगनांचे बिभत्स कामोत्तेजक नेत्रांनी अवलोकिले आहेत. त्यांचे अपवित्र स्पर्श आणि मदिरा मांसाहाराने विटाळलेला आहे हा देह... . . . . देवतुल्य आचार्यांच्या मंगल चरणांना स्पर्श करण्याचे पावित्र्य आता माझ्याकडे उरले नाही, तात!” दत्तांचे ...Read More

5

पापक्षालन - 5 ( अंतीम भाग )

पापक्षालन भाग 5स्वतः तेजदत्त निवडक स्वारांसह राजप्रासादावर चाल करुन गेले. दत्तांनी राजप्रासादाला वेढा घातला. आदल्या रात्रीच्या नशेत गुंग झालेले समशेरी परजीत प्रासादाबाहेर धावले. प्रासादातील रक्षकांची संख्या विपुल होती. परंतु बेसावध असताना झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले होते. लोहपट्टीकेच्या अद्भुत शस्त्राची चांगली किमया झाली अन् रक्षकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. राजरक्षकांचा प्रतिकार क्षीण झालेला दिसताच तो मोका साधून तेजदत्तानी राजप्रासादात प्रवेश केला. यवन सरदारासह प्रासादातील सर्व रक्षक जेरबंद झाले. सरदाराचे दोन्ही हात छाटून त्याला एका अश्वावर बसवून संपूर्ण राजधानीत फिरवून विभवेवर पूर्व सत्ताधिश मेघवत्सांचे पुत्र तेजदत्त यांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याची दवंडी ...Read More