जात या नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मला आनंद होत आहे. ती माझी एकशे दोनवी पुस्तक आहे. जात या पुस्तकाबद्दल सांगतांना मलाही संभ्रमच वाटतो. कारण माझी ही एकशे दोनवी पुस्तक जरी असली तरी वाचकांच्या गर्दीत माझी पुस्तक तेवढी गर्दी करीत नसल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. जरीही कसदार लेखन व विचार माझ्या पुस्तकात आहेत असं काही वाचकांचं म्हणणं असलं तरी. याबाबत एक फोन होता. गोविंद गोपाळ गायकवाड नावाची कादंबरी. ही कादंबरी त्यांनी ई साहित्याच्या साईटवर वाचली होती. त्यावेळेस त्या वाचकांचं म्हणणं होतं की शिवाजी सावंतच्या छावा कादंबरीत संभाजी महाराजांचं वर्णन आहे. परंतु आपण त्यानंतर कल्पकतेनं जे पुस्तकरुपात रंगवलंत. ते अगदी वाखाणण्याजोगेच आहे. कारण ज्या औरंगजेबानं संभाजीला सोडलं नाही. त्या औरंगजेबानं त्या महान राजाला अग्नी देणाऱ्या व मांसाचं विखुरलेलं शरीर शिवणाऱ्याला सोडलं असेल काय? मात्र आपण हेच दृश्य केवळ कल्पनेनं साकारलं. साहेब, लिहिण्यालाही कसब लागतं.
Full Novel
जात - भाग 1
जात या कादंबरीबद्दल जात या नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मला आनंद होत आहे. ती एकशे दोनवी पुस्तक आहे. जात या पुस्तकाबद्दल सांगतांना मलाही संभ्रमच वाटतो. कारण माझी ही एकशे दोनवी पुस्तक जरी असली तरी वाचकांच्या गर्दीत माझी पुस्तक तेवढी गर्दी करीत नसल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. जरीही कसदार लेखन व विचार माझ्या पुस्तकात आहेत असं काही वाचकांचं म्हणणं असलं तरी. याबाबत एक फोन होता. गोविंद गोपाळ गायकवाड नावाची कादंबरी. ही कादंबरी त्यांनी ई साहित्याच्या साईटवर वाचली होती. त्यावेळेस त्या वाचकांचं म्हणणं होतं की शिवाजी सावंतच्या छावा कादंबरीत संभाजी महाराजांचं वर्णन ...Read More
जात - भाग 2
जात कादंबरी भाग दोन पोलीस...... पोलिसांवर कधीकधी शंकाच घेतली जाते. कारण त्यांचं वागणं. त्यांचं वागणं एवढं अजब असतं की त्यांच्यावर सहजच शंका निर्माण होत असते यात शंकाच नाही. मग एखादी महिला पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांचं वागणं अजबच बाई असे म्हणायला कचरत नाही. म्हटलं जातं की अकस्मात अपराधाची स्थिती उत्पन्न होत असेल तर एकशे बारा क्रमांकावर फोन करावा. मुलांच्या बाबतीत काही समस्या असल्यास एक हजार अठ्ठ्यानव या क्रमांकावर फोन करुन लावावा. पोलीस येतात व अपराध टळतो. त्यातच पोलीस कन्ट्रोल रुमचाही क्रमांक लावावा. परंतु कधीकधी असा क्रमांक लावूनही उपयोग नसतो. जेव्हा तो कामात येत नाही. कधी पुरावा ...Read More