आकाशात सर्वत्र ढग दाटून आलेले होते. कधीही वाऱ्याची थंड झुळूक येईल आणि त्या ढगांतून पाण्याच्या धारा गडगडत खाली पडतील, असं एकदम आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं. मी मात्र, पावसाचं पाणी गाडीच्या आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद करून घरी जात होतो. पण आज, ज्या पावसाला मी एवढं टाळत होतो,त्याच पावसात, कधीकाळी मी शरीराने आणि मनाने पूर्णपणे चिंब भिजून गेलो होतो. जरी मी शरीराने गाडीच्या आत बसलो होतो, तरी मनाने भूतकाळातील त्या आठवणींमध्ये डोकावायला सुरुवात केली होती.आठवणी म्हणजे जणू काही मुंग्यांच्या वारुळास
पावसांच्या सरी - भाग 1
आकाशात सर्वत्र ढग दाटून आलेले होते. कधीही वाऱ्याची थंड झुळूक येईल आणि त्या ढगांतून पाण्याच्या धारा गडगडत खाली पडतील, एकदम आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं. मी मात्र, पावसाचं पाणी गाडीच्या आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद करून घरी जात होतो. पण आज, ज्या पावसाला मी एवढं टाळत होतो,त्याच पावसात, कधीकाळी मी शरीराने आणि मनाने पूर्णपणे चिंब भिजून गेलो होतो. जरी मी शरीराने गाडीच्या आत बसलो होतो, तरी मनाने भूतकाळातील त्या आठवणींमध्ये डोकावायला सुरुवात केली होती.आठवणी म्हणजे जणू काही मुंग्यांच्या वारुळासारख्या असतात एकदा त्या सुरू झाल्या की थांबायचं नावच घेत नाहीत. मी कधी माझ्या विचारांत हरवत महाविद्यालयात पोहोचलो, हे मलाच ...Read More
पावसांच्या सरी - भाग 2
आज खूप दिवसांनी बाल्कनीत बसून चहा घेण्याचा योग आला आहे. रोजच्या ऑफिसच्या कामामुळे आणि मुलांच्या शाळेच्या धावपळीत वेळ मिळत जर स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याला खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणता येईल का? की स्त्रीचा जन्म फक्त इतरांसाठीच जगण्यासाठी झाला आहे? बाहेर एवढं सुंदर वातावरण आहे, आणि मी काय विचार करत आहे! त्या सुंदर निसर्गाचं, ढगांचं आणि एकूणच वातावरणाचं चहा घेत आनंद घेतला पाहिजे. पण आज हे ढग मला ओळखीचे का वाटत आहेत? असं वाटतंय, जणू काही यांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्यांना पाहून मनात एक वेगळीच चलबिचल आणि ओढ निर्माण झाली, जणू मीच त्यांची वाट पाहत ...Read More
पावसांच्या सरी - भाग 3
आज एवढं ट्रॅफिक का झालंय, काही कळत नाही. मोबाइलवर सतत मेसेज नोटिफिकेशन्स येत आहेत. "जाऊ दे," असं मनाशी म्हणत, संपल्यावर घरी जाऊन बघू असं ठरवलं. या विचाराने मी मोबाइलकडे दुर्लक्ष केलं आणि रस्त्यावर ट्रॅफिक मोकळं होण्याची वाट पाहू लागलो. बघता बघता या कंपनीत आठ वर्षं कधी झाली, ते कळलंच नाही. खरं तर, इतक्या लांब नोकरीसाठी येईन, याची कल्पनाही नव्हती. पण काही महिन्यांचाच काळ उलटला असावा, असे वाटत असतानाच संपूर्ण आठ वर्षं कधी निघून गेली, हे समजलेच नाही. शेवटी ट्रॅफिक मोकळं झालं, आणि माझ्या कारने वेग घेतला. पुढच्या तीस मिनिटांतच मी घरी पोहोचलो. शाळेला सुट्टी असल्यामुळे घरचे सगळे गावाकडे गेले ...Read More