दुष्ट चक्रात अडकलेला तो

(18)
  • 62.3k
  • 0
  • 39.4k

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो.

1

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो. अजित : नाश्ता झाला आहे का ग? आणि अभी उठला का ? आरती : हो...उठून नाम जपाला बसला आहे... त्याचं आवरलं की सगळे एकत्रच बसू नाश्ता करायला... अजित : बर तोवर मला चहा तर दे... आरती : हो आणते... अजित : आज मला यायला उशीर होईल ग.... आरती : का अहो ? अजित : अगं तो चारुदत्त ...Read More

2

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 2

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचा दिनक्रम आटोपून अभिमन्यू कॉलेजमध्ये येतो. तो त्याची बुलेट पार्क करत असतानाच तिथे विनिता येते.विनिता : मॉर्निंग सर...अभिमन्यू : गुड मॉर्निंग...आज चक्क तू लवकर आली आहेस कॉलेजला...गुड...अशीच वेळेवर येत जा...विनिता : हो सर, मला तुम्हाला विचारायचं होत सर की तुम्ही शिकवणी घेता का ?अभिमन्यू : मी खाजगी शिकवणी घेत नाही...माझ्याकडे तेवढा वेळ नाही... तुला काही अडचण असेल तर वर्ग सुरू असताना विचारत जा किंवा मग कॉलेज संपल्यावर ये... पण मी २ पर्यंतच असतो इथे...विनिता : पण सर शिकवणीचा चांगला पर्याय आहे ना...पैसे ही अधिक मिळतात... आणि विद्यार्थ्याला नीट शिकून घेता येतं...अभिमन्यू : मला अधिकच्या पैशांची हाव ...Read More

3

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 3

साधिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर, सुरज चकित होतो आणि एक विचार त्याच्या मनात चमकतो. तो साधिका सांगते आहे हे शांतपणे ऐकू लागतो.साधिका : सुरज मी जे बोलले ते खरं आहे ना?सुरज : हो ताई...माधव : म्हणजे तुला हा येणार आहे हे आधीच माहिती होतं...साधिका : हो आज सकाळी मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले होते. अशातच मला सुदामा काका जे गीत म्हणायचे ते ऐकू आलं. मला तेव्हा असं वाटलं की त्यांच्याशी संबंधित असं काहीतरी घडणार आहे... आणि माझ्या गुरुंना याविषयी मी सांगितलं. त्यांनी आज एक मुलगा येणार आहे त्याला तुमच्यासोबत काम करायची परवानगी द्यायची असं सांगितलं...आणि जेव्हा मी ...Read More

4

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 4

आरती आणि अजित जेवतानासुध्दा भूतकाळात घडलेल्या घटनेच्या विचाराने अस्वस्थ झाले. इतकी वर्ष लोटली मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही त्यांच्या तसेच आहेत. अभिमन्यू जेवत असताना या दोघांचे निरीक्षण करतो. त्या दोघांच्या असं अवस्थ होण्याने काही तरी भयानक घडून गेल्याची जाणीव त्याला होते. जेवणे वैगरे आटोपल्यावरही त्या दोघांना असं शांत पाहून अभिमन्यू स्वतःचं बोलायला सुरुवात करतो."आई - बाबा, तुम्ही दोघे एवढे अस्वस्थ का झाला आहात? तुम्हाला ती घटना सांगताना त्रास होणार असेल तर नका सांगू" अभिमन्यू."हे बघ राजा, आजा ना उद्या आम्हाला तुला ही गोष्ट सांगावी लागेलच ना? आणि तसंही आम्ही सगळं तुला सांगणार होतो. फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो" ...Read More

5

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 5

शलाकाला पाहून साधिकाच्या मनात एक संशय येतो मात्र सध्या श्रेयाला यातून बाहेर काढणं जास्त गरजेचं असल्याने ती आजीला काही देऊन तिकडून निघते. आज रात्री श्रेयाच्या शरीरात असलेल्या आत्म्याचा नायनाट करायचा या निर्धाराने ती घरी येते व शुचिर्भूत होऊन ध्यानाला बसते.------------------------------------------------------------राजाध्यक्ष घरी येताच कपाटातून काही जुने पुस्तके काढतो. त्यातल्या एका पुस्तकातील फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरतात. खरचं आंजनेय जिवंत असेल तर...आपलं काही खरं नाही..त्याला एव्हाना आपण केलेली दगाबाजी कळलीही असेल. बापरे मग आपल्याला लवकरात लवकर त्याच्याविषयी शोध घ्यायला हवाय. पण त्याच्याविषयी माहिती कुठून मिळेल? अशा सगळ्या विचारात तो असतानाच त्याला त्याच्या कपाटात एका ठिकाणी लपवून ठेवलेला साधकांचा वेश ...Read More

6

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 6

जंगलाच्या दिशेने चालत आलेली साधिका एक क्षण डोळे मिटून एक मंत्र पुटपुटते. क्षणात एक सोनेरी रंगाचा दरवाजा प्रकट होताच त्यात प्रवेश करते. समोर दिमाखात उभा असलेला टोलेजंग वाडा पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हासू पसरते. वाड्यात प्रवेश करताच दत्तात्रेयांचे नामस्मरण करणारा एक तिच्या कानावरआवाज पडतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाते. नामस्मरणात गुंग असलेलातो तेजपुंज चेहरा पाहून तिला प्रसन्नता जाणवते. तिची चाहूल लागताच तो तेजपुंज चेहरा तिच्याकडे वळतो आणि साधिका त्या व्यक्तीला मिठी मारते.साधिका: आजोबा, कसे आहात तुम्ही?आजोबा : नेहमीच तर भेटतेससाधनेच्या मार्फत... आणि भेटलीसका हा प्रश्न विचारतेस... काय बोलावं...तुला यायला उशीर का झाला?साधिका: अहो, एक व्यक्ती माझा पाठलाग करत ...Read More

7

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 7

श्रेयाच्या घरातून निघालेलीसाधिकाथेट गुरूंच्या घरी येते. ती येताच तिचे गुरु तिला हातपाय धुवून त्यांच्या खोलीतयायला सांगतात.आजोबा : हे हळदीच घे... तुला जरा ताकद आल्यासारखं वाटेल...साधिका: आजोबा तुम्ही या दुधात कोणती औषधी मिसळता?आजोबा : काहीही मिसळतनाही...साधिका: खरच?आजोबा : हो... अगदी खरं... बर तू सांग... कामगिरी कशी पार पडली? तस बघायला गेलं तर अगदी सोप्प काम होतं...साधिका: हो.. पण आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाही हे प्रकरण...आजोबा : हो.. मगाशी शोध घेतला मी त्याचा... त्या मुलीला अडकवलं गेलं आहे.. तुला आठवत तारा... मी तुला अभिमन्यू नावाच्या मुलाबद्दल सांगितलं होतं...साधिका: हो... त्या मुलाचा इथे काय संबंध?आजोबा : आहे... बघ जे मला जाणवलं ते ...Read More

8

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 8

कारंडेंच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर अभिमन्यूला हायसे वाटते व तो स्टाफरूममध्ये येतो. जरा वेळ शांत बसून तो आता झालेल्या संवादाविषयी मेसेज करून कळवतो. त्याने कारंडेंच्या केबिनमध्ये काहीतरी पाहिले पण नेमकं काय हे त्याला आठवत नव्हते. ------------------------------ ------------------------------ ----- घरी आलेली साधिका तिला मंदिरात गुरूजींनी दिलेली चिठ्ठी वाचते. पुन्हा एकदा सुदामाच पत्र मदतीसाठी आलं होतं पण सुरुवात कुठून करायची हे मात्र तिला कळत नव्हतं. तिने लागलीच मारुतीला फोन केला आणि सुदामाविषयी काही सापडतंय का तेही तपासून पाहायला सांगितलं. आजोबंशी सुदामाबाबत बोलायचे ठरवून ती श्रेयाच्या घरी जायला निघते. साधिका : उल्का, मी जरा त्या आजींकडे जाऊन येते आणि मी तुला एक मेसेज ...Read More

9

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 9

अभिमन्यू आरतीला घेऊन हॉलमध्ये येतो. तेवढ्यात सधिकाही कॉफी आणते. या तिघांच्याही डोक्यात विचारांचे काहूर माजते. साधिका : काकू, मला काही प्यायला किंवा बाहेर काही खाल्ले होते का? आरती : मी बाहेरच सहसा खात नाही…आणि भोवळ कशी येईल? मी चहा - नाश्ता करून गेले होते. हा, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायले…पण पाण्याची बॉटलही माझीच होती… साधिका : मला दाखवता का बॉटल… आरती : अभिमन्यू, माझी पिशवी आणतोस का? अभिमन्यू : हो, साधिका : काकू अजून काही आठवत का? आरती : हो, अभिमन्यूची विद्यार्थिनी भेटली होती. तिच्याशी बोलले आणि याला गवार आवडते म्हणून मी पुढे आले. भाजी घेतल्यावर घराच्या ...Read More

10

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 10

घरी आल्यावर साधिका आधी फ्रेश होते आणि ध्यानाला बसते. तिने सकाळपासून काहीच न खाल्ल्याने उल्का तिला बोलवायला तिच्या खोलीत आणि साधीकाच्या भोवताली डोळे दिपवणारा प्रकाश पाहून ती स्तब्ध होते. तिचे डोळे भरून येतात. आजी आणि आई सतत ताईची काळजी का करायच्या हे तिला आता उमगले होते. ताईजवळ काही तरी खास आहे हे तिला सतत जाणवत होतं आणि त्याविषयी ती नेहमी आजीला विचारायची सुद्धा पण अपेक्षित असं उत्तर तिला मिळालंच नाही. ती तशीच किती तरी वेळ उभी होती. तेवढ्यात साधिकाला तिच्या आसपास कुणाच्या तरी असण्याची चाहूल लागताच ती ध्यानातून बाहेर येते. साधिका : काय ग उल्के काय झालं? उल्का : ...Read More

11

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 11

कारंडेला भेटल्यावर साधिका गुरूंकडे जाते. साधिका : आजोबा, आजोबा कुठे आहात ? आजोबा : मी इथे वरच्या खोलीत आहे…तू ये… साधिका : बर आले… ती वर येईपर्यंत आजोबा त्यांची पेटी आवरून ठेवतात. ते त्या पेटीला लॉक लावणार इतक्यात तिथे साधिका येते. साधिका : आजोबा, काय आहे त्या पेटीत? आजोबा : वेळ आली की दाखवेन…त्यापेक्षा महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे सध्या… नाही का? साधिका : हो…तेही आहेच…आजोबा मी आता कारंडेला भेटले…काही गोष्टींचा उलगडा झाला आहे तर, काहींचा बाकी आहे… आजोबा : तू सगळं नीट सविस्तर सांग…म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल… साधिका तिचे कारंडेशी झालेले बोलणे आजोबांना सांगते. त्यानंतर ती आणि ...Read More

12

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 12

आजोबांच्या म्हणजेच आंजनेयच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून दिगंबर विचारात पडतो. आज ना उद्या आंजनेय मदतीला बोलावणार याची खात्री त्याला होतीच हे इतक्या लगेच घडेल असे त्याला वाटले नव्हते. त्याचे विचारचक्र चालूच होते की तिथे साधिका येते. तिला पाहून त्याला धक्काच बसतो तर, कुर्ता आणि जीन्समध्ये तिच्यासमोर उभ्या असलेल्या दिगंबरला पाहून ती चकित होते. म्हणजे याला कोणी पाहिलं तर कोणाला खरं वाटणारं नाही की हा एक नावाजलेला अघोरी आहे. दिगंबर : तू नक्की कोण? साधिका : मी साधिका, आजोबांची नात… दिगंबर : अंजनीची मुलगी का तू ? साधिका : नाही…माधवची मुलगी मी… दिगंबर : बर… हे दोघे बोलत असतानाच तिथे आजोबा ...Read More

13

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 13

सगळं ऐकल्यावर साधिकाच्या डोक्यात वेगात विचारचक्र फिरायला लागतात. अर्जुनला कसं सोडवायचं याचा विचार करता करता तिचा डोळा लागतो. रेणुका साधिका झोपल्याची खात्री होताच आजोबा आणि दिगंबर एका खोलीत जातात आणि त्या खोलीत असलेल्या दत्तांच्या तसबिरीपुढे डोळे मिटून बसतात. —----------------------------------------------------- सकाळी उठल्यावर काहीतरी विपरीत घडेल या जाणिवेने अभिमन्यूला अस्वस्थ वाटू लागते. तो आज येणार नसल्याचे त्याच्या महाविद्यालयात कळवतो आणि एकदा श्रेयाला फोन करतो. मात्र तिने फोन न उचलल्याने तो साधिकाला भेटायचे ठरवतो आणि आवरायला घेतो. आरती : काय हो, अभि अजून कसा खाली आला नाही…अजून झोपूनच आहे की काय? अजित : तू नाश्ता वाढायला घे…मी त्याला बघून येतो… तेवढ्यात अभिमन्यू ...Read More

14

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 14

आरती श्रेयाला घरी घेऊन येते आणि साधिकाला त्याविषयी कळवते आणि ती जेवायला बसते. अजित : आलीस तू? : हो..अभि नीट जेवला ना? अजित : हो आम्ही अगदी व्यवस्थित जेवलो आणि तू पण जेवून घे नीट पण त्या श्रेयाच्या जेवणाच काय? आरती : अहो, तिला मी इकडे घेऊन यायच्या आधी वरण-भात भरवला होता. तिला आता खोलीत झोपवून आलेय… अहो तुम्ही त्या तुमच्या डॉक्टर मित्राला बोलावता का घरी? म्हणजे ते श्रेयाला तपासातील आणि औषध देतील…तिने घडल्या घटनेचा फारच धसका लावून घेतला आहे…मला तर काळजीच वाटते आहे… अजित : हो मी त्याला संध्याकाळी बोलावतो… आणि आपण तिघे ...Read More

15

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 15

साधिकाने शलाका आणलेले पाहून अजित आणि अभिमन्यू विचारात पडतात. तेवढ्यात आरती एकटीच खाली आल्याने अभिमन्यूला हायसे वाटते. शलाका घरात श्रेया तिच्यासमोर येऊ नये असे त्याला मनोमन वाटते. आरती : साधिका, तू हिला घेऊन का आली आहेस? साधिका : काकी, ही फार उपयोगाची आहे आपल्या… अभिमन्यू : हिला असं घरात घेऊन येणं धोक्याचं आहे…उगाच नको त्या फंदात मला पडायचं नाहीयेय…तुला हिला बाहेर सोडून ये… अजित : अभि, साधिका बोलतेय त्याचा रोख माझ्या लक्षात आला आहे…मी तिच्याशी सहमत आहे… आरती : मीही… आणि अभि हिच्याकडे कोणत्याही प्रकारची शक्ती नाही… अभिमन्यू : आई….? शलाका : ...Read More