सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो.
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1
सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो. अजित : नाश्ता झाला आहे का ग? आणि अभी उठला का ? आरती : हो...उठून नाम जपाला बसला आहे... त्याचं आवरलं की सगळे एकत्रच बसू नाश्ता करायला... अजित : बर तोवर मला चहा तर दे... आरती : हो आणते... अजित : आज मला यायला उशीर होईल ग.... आरती : का अहो ? अजित : अगं तो चारुदत्त ...Read More
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 2
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचा दिनक्रम आटोपून अभिमन्यू कॉलेजमध्ये येतो. तो त्याची बुलेट पार्क करत असतानाच तिथे विनिता येते.विनिता : मॉर्निंग सर...अभिमन्यू : गुड मॉर्निंग...आज चक्क तू लवकर आली आहेस कॉलेजला...गुड...अशीच वेळेवर येत जा...विनिता : हो सर, मला तुम्हाला विचारायचं होत सर की तुम्ही शिकवणी घेता का ?अभिमन्यू : मी खाजगी शिकवणी घेत नाही...माझ्याकडे तेवढा वेळ नाही... तुला काही अडचण असेल तर वर्ग सुरू असताना विचारत जा किंवा मग कॉलेज संपल्यावर ये... पण मी २ पर्यंतच असतो इथे...विनिता : पण सर शिकवणीचा चांगला पर्याय आहे ना...पैसे ही अधिक मिळतात... आणि विद्यार्थ्याला नीट शिकून घेता येतं...अभिमन्यू : मला अधिकच्या पैशांची हाव ...Read More
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 3
साधिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर, सुरज चकित होतो आणि एक विचार त्याच्या मनात चमकतो. तो साधिका सांगते आहे हे शांतपणे ऐकू लागतो.साधिका : सुरज मी जे बोलले ते खरं आहे ना?सुरज : हो ताई...माधव : म्हणजे तुला हा येणार आहे हे आधीच माहिती होतं...साधिका : हो आज सकाळी मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले होते. अशातच मला सुदामा काका जे गीत म्हणायचे ते ऐकू आलं. मला तेव्हा असं वाटलं की त्यांच्याशी संबंधित असं काहीतरी घडणार आहे... आणि माझ्या गुरुंना याविषयी मी सांगितलं. त्यांनी आज एक मुलगा येणार आहे त्याला तुमच्यासोबत काम करायची परवानगी द्यायची असं सांगितलं...आणि जेव्हा मी ...Read More
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 4
आरती आणि अजित जेवतानासुध्दा भूतकाळात घडलेल्या घटनेच्या विचाराने अस्वस्थ झाले. इतकी वर्ष लोटली मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही त्यांच्या तसेच आहेत. अभिमन्यू जेवत असताना या दोघांचे निरीक्षण करतो. त्या दोघांच्या असं अवस्थ होण्याने काही तरी भयानक घडून गेल्याची जाणीव त्याला होते. जेवणे वैगरे आटोपल्यावरही त्या दोघांना असं शांत पाहून अभिमन्यू स्वतःचं बोलायला सुरुवात करतो."आई - बाबा, तुम्ही दोघे एवढे अस्वस्थ का झाला आहात? तुम्हाला ती घटना सांगताना त्रास होणार असेल तर नका सांगू" अभिमन्यू."हे बघ राजा, आजा ना उद्या आम्हाला तुला ही गोष्ट सांगावी लागेलच ना? आणि तसंही आम्ही सगळं तुला सांगणार होतो. फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो" ...Read More
दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 5
शलाकाला पाहून साधिकाच्या मनात एक संशय येतो मात्र सध्या श्रेयाला यातून बाहेर काढणं जास्त गरजेचं असल्याने ती आजीला काही देऊन तिकडून निघते. आज रात्री श्रेयाच्या शरीरात असलेल्या आत्म्याचा नायनाट करायचा या निर्धाराने ती घरी येते व शुचिर्भूत होऊन ध्यानाला बसते.------------------------------------------------------------राजाध्यक्ष घरी येताच कपाटातून काही जुने पुस्तके काढतो. त्यातल्या एका पुस्तकातील फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरतात. खरचं आंजनेय जिवंत असेल तर...आपलं काही खरं नाही..त्याला एव्हाना आपण केलेली दगाबाजी कळलीही असेल. बापरे मग आपल्याला लवकरात लवकर त्याच्याविषयी शोध घ्यायला हवाय. पण त्याच्याविषयी माहिती कुठून मिळेल? अशा सगळ्या विचारात तो असतानाच त्याला त्याच्या कपाटात एका ठिकाणी लपवून ठेवलेला साधकांचा वेश ...Read More