तिसरा मजला मृत्यूचा

(4)
  • 11.9k
  • 0
  • 6.5k

जसा देव आहे ना या जगात अशीच एक राक्षसी वृत्ती ही आहे. मला आधी यावर विश्वास नव्हता, पण माझ्यासोबत झालेल्या घटनेनंतर मी पुरता हादरलो. तिसरा मजला मृत्यूचा - भाग एक मी धीरज. नुकताच मी पालनपूर शहरात आलो व शिवशंकर पॅलेस इमारतीतील एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसात नोकरीला लागलो. आमच्या कंपनीचा मॅनेजर रामनाथ नेहमी सांगायचा की ऑफिसात तिसऱ्या मजल्यावर कधीही जाऊ नका पण आम्ही त्याच्या म्हणण्याकडे कायम दुर्लक्ष करत असू. एकदा मी, श्रीधर व देवदास काम संपून सहज गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि ऑफिसमध्ये फक्त आम्हीच होतो. देवदास ने श्रीधरला मजेतच म्हटले, “तू तिसऱ्या मजल्यावर जा आणि बघ तिथे काय आहे ते. एकदा समजून घेऊया ना तिथे काय भूतबाधा आहे."

1

तिसरा मजला मृत्यूचा - भाग 1

तिसरा मजला मृत्यूचा - भयकथा जसा देव आहे ना या जगात अशीच एक राक्षसी वृत्ती ही आहे. मला आधी विश्वास नव्हता, पण माझ्यासोबत झालेल्या घटनेनंतर मी पुरता हादरलो. तिसरा मजला मृत्यूचा - भाग एक मी धीरज. नुकताच मी पालनपूर शहरात आलो व शिवशंकर पॅलेस इमारतीतील एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसात नोकरीला लागलो. आमच्या कंपनीचा मॅनेजर रामनाथ नेहमी सांगायचा की ऑफिसात तिसऱ्या मजल्यावर कधीही जाऊ नका पण आम्ही त्याच्या म्हणण्याकडे कायम दुर्लक्ष करत असू. एकदा मी, श्रीधर व देवदास काम संपून सहज गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि ऑफिसमध्ये फक्त आम्हीच होतो. देवदास ने श्रीधरला मजेतच म्हटले, “तू तिसऱ्या ...Read More

2

तिसरा मजला मृत्यूचा - भाग 2

शिवशंकर पॅलेस इमारतीतील आमच्या ऑफिसवर दुःखाची छटा पसरली होती. वातावरणात एक प्रकारचे भय आणि निराशा जाणवत होती. ऑफिसातील प्रत्येक श्रीधरच्या गंभीर अवस्थेबद्दल चर्चा करत होता. इकडे पालनपूरचे जिल्हाधिकारी सातपाल आपल्या केबिनमध्ये चहा पीत बसले होते. आज त्यांच्या मनात आपल्या काही महत्त्वाच्या कामांचे विचार घोळत होते. तेवढ्यात त्यांच्या मागे त्यांचा पी. ए. जय एक देशभक्तीपर गाणे गात आला व सातपाल साहेबांची केबिन पुसायला लागला. सातपालसाहेब जयशी गप्पा मारत होते तेवढ्यात त्यांना एक फोन आला. साहेब, शिवशंकर पॅलेसमधील एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सातपाल म्हणाले, “काय??.. शिवशंकर पॅलेस इमारतीमध्ये माझा भाऊ श्रीधर काम करतो. त्याला नाही ना झाली आहे ...Read More