करामती ठमी

(24)
  • 45.8k
  • 1
  • 22.9k

ठमी ही माझी आत्ये बहीण आहे आणि आम्ही एकाच वयाचे असल्याने एकाच वर्गात शिकतो, एकाच बाकावर बसतो. माझ्यात आणि ठमी मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे मी उंच रोड सावळी स्वभावाने शांत आहे तर ठमी अगदी त्याच्या विरुद्ध ठेंगणी सुदृढ गोरी आणि चळवळी आहे. एवढ्या विरुद्ध स्वभावाच्या असलो तरी आम्ही कशा काय न भांडता सतत एकत्र असतो असा मलाच काय आमच्या दोघींच्या आईवडिलांसकट सगळ्या नातेवाईकांना शेजारच्या पाजारच्यांना आजपर्यंत उलघडा झाला नाही. तिच्या आणि माझ्या स्वभावात कसा फरक आहे हे ह्या उदाहरणावरून कळेल. शाळेतून येताना रस्त्यात आम्हाला एक खोकडं पडलेलं दिसलं. मी पायाने ते रस्त्याच्या कडेला लावून ठेवलं. ठमीच्या डोक्यात मात्र काय आलं कोणास ठाऊक तिने ते पायाने ढकलत ढकलत आमच्या घराजवळच्या चौकात आणलं आणि त्यावर मी कचरा खातो असं लिहिलेलं पेंग्विन चं चित्र आणि त्याच्यावर एक ऍरो काढून टाकला. त्यामुळे आपोआपच रस्त्याने जाणारे लोकं कचरा खाली न टाकता त्यात खोक्यात टाकू लागले. चौकातल्या पाणीपुरी वाल्या कडचे लोकं सुद्धा त्या खोक्यात कचरा टाकू लागले.

Full Novel

1

करामती ठमी - 1

ठमी ही माझी आत्ये बहीण आहे आणि आम्ही एकाच वयाचे असल्याने एकाच वर्गात शिकतो, एकाच बाकावर बसतो. माझ्यात आणि मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे मी उंच रोड सावळी स्वभावाने शांत आहे तर ठमी अगदी त्याच्या विरुद्ध ठेंगणी सुदृढ गोरी आणि चळवळी आहे. एवढ्या विरुद्ध स्वभावाच्या असलो तरी आम्ही कशा काय न भांडता सतत एकत्र असतो असा मलाच काय आमच्या दोघींच्या आईवडिलांसकट सगळ्या नातेवाईकांना शेजारच्या पाजारच्यांना आजपर्यंत उलघडा झाला नाही.तिच्या आणि माझ्या स्वभावात कसा फरक आहे हे ह्या उदाहरणावरून कळेल.शाळेतून येताना रस्त्यात आम्हाला एक खोकडं पडलेलं दिसलं. मी पायाने ते रस्त्याच्या कडेला लावून ठेवलं. ठमीच्या डोक्यात मात्र काय आलं ...Read More

2

करामती ठमी - 2 - ठमी चा गायन क्लास

टाकाऊ पासून टिकाऊ क्लास चा बोऱ्या वाजल्यावर ठमीने आपला मोर्चा गायनाकडे वळवला. अचानक सकाळी दात घासताना तिला शोध लागला तिचा जन्म हा गायक होण्यासाठीच झाला आहे. तोंड धुताना गुळणा करताना ती अचानक हरकती(गायनातल्या) घेऊ लागली. तिने जाहीर करून टाकलं. आईबाबा मला शास्त्रीय गायनाचा क्लास लावायचा म्हणजे लावायचा. तिचे आई बाबा म्हणाले, अगं पण असं अचानक कसं ठरलं तुझं? आधीचे उद्योग काय कमी आहेत का तुझे? ते काही नाही, आई बाबा तुम्ही मला जर गायन शिकण्याची परवानगी दिली नाही तर जग एका अभिजात गायिकेला मुकेल आणि पुढे हे जग त्यासाठी तुम्हाला दोष द्यायला कमी करणार नाही तेव्हा विचार करा आणि ...Read More

3

करामती ठमी - 3 - ठमीची फोटोग्राफी

गायनाच्या क्लास चं ते तसं झालं आणि ठमी ला रिकामा वेळ खायला उठला. तिचं चलवळं डोकं तिला शांत बसू तिला हळूहळू फ्रस्ट्रेशन यायला लागलं. परंतु हे तिचं फ्रस्ट्रेशन फार काही टिकलं नाही. त्याचं झालं काय की माझे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांनी आमच्यासाठी आणि माझ्या आत्याला द्यायला असे दोन डिजिटल कॅमेरे आणले. त्यामुळे घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याचा ताबा ठमीच घेणार ह्या नियमाने तिने तो कॅमेरा आत्याच्या हातून अक्षरशः ओढून घेतला. मग काय दिवसभर कुठले न कुठले फोटो ती काढू लागली. त्या कॅमेराने अनेक लपलेल्या बाबी तिने उघडकीस आणल्या. दुधवाल्या गणूकाकाकांचा इकडे तिकडे बघत भररकन ...Read More

4

करामती ठमी - 4 - ठमीची पाककला

मागच्या प्रकरणात आपण बघितलं च आहे की कॅमेरा घेऊन ठमीने खूप करामती केल्या त्यामुळे आत्याने तिच्या हातातून कायमचा तो घेतला. पण शांत बसेल ती ठमी कुठली! तिला अचानक पाक कलेत रुची निर्माण झाली. रोज ती दुपारी एक दीड वाजता आवर्जून टीव्ही वर पाक कलेचे कार्यक्रम बघू लागली. हातात वही पेन घेऊन त्यातील साहित्य कृती लिहून घेऊ लागली. "आई मी रोज बघते तू खूप कामं करते, घरासाठी खूप राबते(आत्याला कळेचना की ठमी एवढी कशी काय शहाणी झाली)त्यामुळे मी ठरवलंय की एक आठवडाभर तुला कूकिंग पासून सुट्टी द्यायची. " "आणि मग कोण स्वयंपाक करणार आठवडाभर?",आत्या ने विचारलं. "कोण करणार काय? ऑफकोर्स ...Read More

5

करामती ठमी - 5 - ठमीचे मॉडर्न आर्ट पेंटिंग

एकदा आमच्या शाळे तर्फे एका मॉडर्न आर्ट पेंटिंग प्रदर्शनाला आम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आमच्या वर्गशिक्षकांसोबत गेलो होतो. सगळे जण रांगेत आम्ही जात होतो. "ऐ ढकलू नको गं मला,ती समोरची मुलगी भराभर चालत नाही त्याला मी काय करू? मला ढकलशील तर आपण सगळ्याच पडू मग मॉडर्न आर्ट राहील बाजूला ",ठमी अखंड बडबडत होती. "बरं बरं! मॉडर्न आर्ट पेंटिंग माहिती आहे का काय आहे ते!",मी विचारलं "हॅ! अगं अशी एक तरी गोष्ट आहे का जगात जी मला माहित नसेल? मला सगळं माहिती आहे!",ठमी तिरपं हसत खांदे उडवत म्हणाली. "मग सांग न!",मी "ते आपलं म्हणजे हे पहा मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणजे....ते मी ...Read More

6

करामती ठमी - 6 - ठमीचा रियालिटी शो आणि अभिनयातील नवरस

ठमीला आजकाल नवाच छंद लागला तो म्हणजे रियालिटी शो बघणे. आधी ठमी फक्त जाहिराती बघत असे. बाकी मालिकांशी तिला देणं घेणं नसे पण आजकाल जाहिरातींपेक्षा तिचे लक्ष वेगवेगळ्या रियालिटी शोज कडे वळलं होतं. मग नृत्याचा रियालिटी शो असो की गायनाचा, अभिनयाचा रियालिटी शो असो की विनोदाचा झाडून सगळ्या चॅनल्स वरचे रियालिटी शोज ठमी शांतपणे मांडी घालून एका हातावर हनुवटी टेकवून एकाग्र चित्ताने बघू लागली. तिचा हा एकाग्र पणा बघून तिच्या आजी-आजोबा व आई-बाबा ह्यांच्या हृदयात धडकी भरू लागली.तिचे आजोबा तर तिच्या आजीला म्हणाले सुद्धा, "पोरीने असा एकाग्रतेने अभ्यास केला तर कुठल्या कुठे जाईल." त्यावर तिची आजी म्हणे," हो न! ...Read More