सायबर सुरक्षा

(4)
  • 17.7k
  • 0
  • 7.5k

अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस नव्हता. २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले व लिंक वर क्लिक केले व आलेल्या फॉर्म मध्ये पॅन कार्ड चा नंबर अकाउंट नंबर आणि अजून नाव , मोबाइल नंबर अशी माहिती टाकल्यानंतर वेरिफिकेशन साठी आलेला ओ टी पी भरून तो फॉर्म सबमिट केला. त्यांच्या हिशोबाने त्यांनी तर सर्व व्यवस्थित केले होते. आता अकाउंट बंद होऊ नये म्हणून एवढे तर करावेच लागेल, नाहीतर परत बँकेत चकरा कोण मारणार. पण त्याना हे माहित नव्हते के त्या लिंक वर क्लिक केल्याचं क्षणी त्या सायबर गुन्हेगारीच्या बळी झाल्या होत्या. मग काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले कि त्यांच्या खात्यातून सर्व पैसे संपले आहेत. मग पुढं काय ? , त्यांना झालाय काय आणि पुढे करायचं काय हेच कळत नव्हते. हॅकर्स नि फिशिंग नावाची युक्ती वापरली आणि कदम मॅडम कढून बँकेची माहिती - अकाउंट नंबर वगैरे घेतला आणि पैसे ट्रान्सफर करून घेतले. फक्त एका क्लिक मध्ये त्याची पूर्ण जमा पुंजी गायब झाली.

1

सायबर सुरक्षा - भाग 1

अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले ...Read More

2

सायबर सुरक्षा - भाग 2

सायबर सुरक्षा म्हणजे काय ? इंटरनेट सुरक्षा किंवा सायबर सुरक्षा म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करताना स्वतःला सुरक्षित प्रत्यन करणे. इंटरनेट चा वापर करताना खाजगी आणि वयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे त्या संबंधित नवीन नवीन जोखिमबद्दल स्वतःला जागरूक ठेवणे, सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजेच सायबर सुरक्षा. सायबर सुरक्षा महत्वाची का आहे : सायबर गुन्हेगारी हि काही एक प्रकारची नाही ऑनलाईन फसवणूक म्हणा, हॅकिंग म्हणा किंवा आयडेंटिटी थेफ्ट म्हणजेच आपली ऑनलाईन ओळख चोरणे. असे अनेक प्रकार होतात. ज्यासाठी स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. सायबर सुरक्षितते बद्द्ल जागरूक राहून तुम्ही तुमचे पैसे आणि वयक्तिक माहिती चोरण्या पासून रोखू ...Read More

3

सायबर सुरक्षा - भाग 3

**रामूच्या गोष्टीतून शिकलेला सायबर धडा**रामू शेतकरी, गावातल्या छोट्याशा शेतात मेहनत करून कुटुंब चालवतो. मागच्या हंगामात चांगला नफा झाला म्हणून ठरवलं की, बियाणं आणि खतं ऑनलाईन खरेदी करावी. एका सोशल मीडियाच्या जाहिरातीत त्याला एक चांगली ऑफर दिसली – "50% डिस्काउंटमध्ये खतं आणि बियाणं!" रामूला ऑफर आकर्षक वाटली.त्याने लगेच दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, एक फॉर्म भरला आणि 10,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पैसे भरल्यानंतर काही दिवस वाट पाहूनही वस्तू आल्या नाहीत. शेवटी रामूने कंपनीला फोन लावला, पण तो नंबर बंद होता. तेव्हा त्याला कळलं की, तो एका ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरलाय.ऑनलाईन फसवणुकीचे प्रकाररामूसारख्या अनेक लोकांना या प्रकारची फसवणूक होते. ऑनलाईन जगात ...Read More