सायबर सुरक्षा

(8)
  • 25.3k
  • 0
  • 10.5k

अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस नव्हता. २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले व लिंक वर क्लिक केले व आलेल्या फॉर्म मध्ये पॅन कार्ड चा नंबर अकाउंट नंबर आणि अजून नाव , मोबाइल नंबर अशी माहिती टाकल्यानंतर वेरिफिकेशन साठी आलेला ओ टी पी भरून तो फॉर्म सबमिट केला. त्यांच्या हिशोबाने त्यांनी तर सर्व व्यवस्थित केले होते. आता अकाउंट बंद होऊ नये म्हणून एवढे तर करावेच लागेल, नाहीतर परत बँकेत चकरा कोण मारणार. पण त्याना हे माहित नव्हते के त्या लिंक वर क्लिक केल्याचं क्षणी त्या सायबर गुन्हेगारीच्या बळी झाल्या होत्या. मग काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले कि त्यांच्या खात्यातून सर्व पैसे संपले आहेत. मग पुढं काय ? , त्यांना झालाय काय आणि पुढे करायचं काय हेच कळत नव्हते. हॅकर्स नि फिशिंग नावाची युक्ती वापरली आणि कदम मॅडम कढून बँकेची माहिती - अकाउंट नंबर वगैरे घेतला आणि पैसे ट्रान्सफर करून घेतले. फक्त एका क्लिक मध्ये त्याची पूर्ण जमा पुंजी गायब झाली.

1

सायबर सुरक्षा - भाग 1

अनुराधा कदम, गातेगाव मधील जिल्हा परिषद शाळेत गेली ८ वर्ष शिक्षिका म्हणून रुजू आहेत. तो त्यांच्या साठी नवा दिवस २:३० ते ३:३० च्या ऑफ तासात चौथीचे गणिताचे पेपर तपासात स्टाफ रूम मध्ये त्या बसल्या होत्या. तेवढ्यात त्याचा स्मार्टफोन व्हायब्रेट झाला 'झझ्झ झझ्झ'. त्याना एक एस एम एस आला होता बँके कढून, त्यात असा लिहलं होता कि त्यांच के वाय सी न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद ब्लॉक केले जाईल. खालील लिंक वरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर उपडेट करा. आणि खाली एक लिंक दिली होती. दुसरा तिसरा काही विचार न करता कदम मॅडम नि पर्स मधून पॅन कार्ड काढले ...Read More

2

सायबर सुरक्षा - भाग 2

सायबर सुरक्षा म्हणजे काय ? इंटरनेट सुरक्षा किंवा सायबर सुरक्षा म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करताना स्वतःला सुरक्षित प्रत्यन करणे. इंटरनेट चा वापर करताना खाजगी आणि वयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे त्या संबंधित नवीन नवीन जोखिमबद्दल स्वतःला जागरूक ठेवणे, सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजेच सायबर सुरक्षा. सायबर सुरक्षा महत्वाची का आहे : सायबर गुन्हेगारी हि काही एक प्रकारची नाही ऑनलाईन फसवणूक म्हणा, हॅकिंग म्हणा किंवा आयडेंटिटी थेफ्ट म्हणजेच आपली ऑनलाईन ओळख चोरणे. असे अनेक प्रकार होतात. ज्यासाठी स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. सायबर सुरक्षितते बद्द्ल जागरूक राहून तुम्ही तुमचे पैसे आणि वयक्तिक माहिती चोरण्या पासून रोखू ...Read More

3

सायबर सुरक्षा - भाग 3

**रामूच्या गोष्टीतून शिकलेला सायबर धडा**रामू शेतकरी, गावातल्या छोट्याशा शेतात मेहनत करून कुटुंब चालवतो. मागच्या हंगामात चांगला नफा झाला म्हणून ठरवलं की, बियाणं आणि खतं ऑनलाईन खरेदी करावी. एका सोशल मीडियाच्या जाहिरातीत त्याला एक चांगली ऑफर दिसली – "50% डिस्काउंटमध्ये खतं आणि बियाणं!" रामूला ऑफर आकर्षक वाटली.त्याने लगेच दिलेल्या लिंकवर क्लिक केलं, एक फॉर्म भरला आणि 10,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पैसे भरल्यानंतर काही दिवस वाट पाहूनही वस्तू आल्या नाहीत. शेवटी रामूने कंपनीला फोन लावला, पण तो नंबर बंद होता. तेव्हा त्याला कळलं की, तो एका ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरलाय.ऑनलाईन फसवणुकीचे प्रकाररामूसारख्या अनेक लोकांना या प्रकारची फसवणूक होते. ऑनलाईन जगात ...Read More

4

सायबर सुरक्षा - भाग 4

** फार्मसी मालकाची डिजिटल अरेस्ट फसवणूक **विजय पाटील हे महाराष्ट्रातील एका छोट्या गावात फार्मसी चालवणारे व्यावसायिक होते. विजय यांचा गावात चांगला चालत होता, आणि लोक त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवत असत. व्यवसायाचा दिवस अगदी नेहमीप्रमाणे सुरू असताना, त्यांना एका दुपारी एक अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिस विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले.“विजय पाटील बोलत आहेत का? तुमच्याशी अत्यंत गंभीर प्रकरणात बोलायचे आहे,” असे त्या व्यक्तीने कठोर आवाजात सांगितले. विजय यांनी होकार दिला आणि फोन पुढे ऐकायला सुरुवात केली. फोन करणाऱ्याने सांगितले की, “तुमच्या नावाने औषध तस्करीशी संबंधित एक मोठा गुन्हा नोंदवला गेला आहे. तुमच्यावर अटक वॉरंट ...Read More

5

सायबर सुरक्षा - भाग 5

गावातील फसवणुकीची कथा आणि बनावट कर्ज अ‍ॅप्सविषयी जागरूकताआमच्या गावातील रामूभाऊ, साधे आणि प्रामाणिक शेतकरी होते. त्यांचे कुटुंब शेतकामावर अवलंबून आणि त्यांचे उत्पन्न साधारण होते. शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी ते नेहमीच नवीन मार्ग शोधत असत. एका दिवशी त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला, ज्यामध्ये लिहिलं होतं, "तुमच्यासाठी झटपट कर्ज! कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय, फक्त एका क्लिकवर!" रामूभाऊंना वाटलं की हा संदेश त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त ठरेल. त्यांना खतं आणि बियाणं खरेदीसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते अ‍ॅप डाउनलोड केलं.अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर रामूभाऊंना कर्जासाठी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती भरायला सांगितलं. त्यांना सांगण्यात आलं की ...Read More

6

सायबर सुरक्षा - भाग 6

️व्हॉट्सअ‍ॅपवरील अफवांमुळे निर्दोष तरुणाचा मृत्यू ️धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात एक भयंकर घटना घडली. 19-20 वर्षांचा एक तरुण संतोष, कामानिमित्त गावातून दुसऱ्या गावात आला होता. त्याच्या आधी काही पंधरा दिवसा पासून गावातील काही लोकांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरायला लागला. त्या संदेशात एका तरुणाच्या फोटोसह एक खोटी माहिती दिली होती, ज्यात म्हटले होते, "हा मुलगा चोर आहे, तो लहान मुलांना अपहरण करण्यासाठी गावात फिरत आहे."गावातील बाजारात व बँकेत हिंडताना काही गावकर्यांनी संतोष ला बघितले , संदेशात दिसणारा फोटोतील अपहरण करणारा हाच आहे असे समजून , त्याला गावकऱ्यांनी त्या क्षणी आपले शंकेचे लक्ष्य म्हणून धरले. एकमेकांना फोटो व संदेश दाखवून ...Read More

7

सायबर सुरक्षा - भाग 7

ब्लू व्हेल चॅलेंजने घेतलेला बळी: डिजिटल युगातील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मुंबईत एका किशोरवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना 2017 साली आली होती. या मुलावर इंटरनेटवरील एका भयानक खेळाचा प्रभाव होता, ज्याचे नाव होते ब्लू व्हेल चॅलेंज. हा खेळ तरुणांमध्ये मानसिक ताण निर्माण करून त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करत असे. अशा घटनांनी पालक आणि समाजाला मुलांच्या डिजिटल वर्तनावर विचार करायला लावले. इंटरनेटने जीवन सुलभ केले असले तरी याचा योग्य वापर न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.️ब्लू व्हेल चॅलेंज: एक घातक खेळ ️ब्लू व्हेल चॅलेंज हा 50 दिवसांचा ऑनलाइन खेळ होता. यात खेळाडूंना 50 वेगवेगळी आव्हाने दिली जात आणि शेवटचे ...Read More

8

सायबर सुरक्षा - भाग 8

खोट्या सरकारी योजनांचे फसवे जाळे🫢हि घटना एका शेतकऱ्याची आहे, जो उत्तर महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहत होता. त्याचं नाव आहे, आणि तो शेती करतो. ‍ त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार असलेली शेती जास्त नफा देणारी नाही, तरीही तो त्याच्या कुटुंबासाठी कष्ट घेत होता. काही दिवसांपूर्वी, अंगदला एका मोबाईल संदेशात कळले की "सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज योजना सुरू करत आहे. तुम्ही लगेच नोंदणी करा आणि ₹500 शुल्क भरा, नंतर तुम्हाला ₹50,000 कर्ज मिळेल."त्याला यावर विश्वास बसला, कारण त्याने आधी देखील काही सरकारी योजनांबद्दल ऐकले होते आणि त्याला वाटलं की हा एक उत्तम संधी आहे. त्याने त्याच्या जवळच्या मित्राला, जो इंटरनेटवर थोडा ...Read More

9

सायबर सुरक्षा - भाग 9

लोन ऍपचा घोटाळा आजकाल स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. एका क्लिकवर कर्ज मिळवणंही त्यातलंच एक. मात्र, याच तंत्रज्ञानाचा घेत काही सायबर गुन्हेगार लोन ऍपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहेत. एका घटनेत, पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने एका लोन ऍप वरून ₹10,000 कर्ज घेतलं, परंतु फक्त ₹7,000 त्याच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून कपात करण्यात आली. काही दिवसांनी त्याच्यावर मोठ्या व्याजासह पैसे फेडण्याचा तगादा लागला. अटी पाळल्या नाहीत तर त्याच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करण्याची धमकी देण्यात आली. ही घटना फक्त एकच नाही; अशा अनेक प्रकरणांमुळे लोन ऍपच्या फसवणुकीची धोकादायक बाजू उघड झाली आहे. फसवणुकीची पद्धत 1. अतिशय ...Read More

10

सायबर सुरक्षा - भाग 10

"जमीन खरेदी आणि घर भाडेतत्त्वातील सायबर फसवणूक: धोके आणि संरक्षण"️‍️️पुण्यातील अमोल नवीन नोकरीसाठी शहरात स्थलांतर करत होता. कामाच्या गडबडीत लवकरात लवकर भाड्याने घर शोधायचं होतं. त्याने इंटरनेटवर शोध सुरू केला आणि एका लोकप्रिय वेबसाइटवर घरांच्या जाहिराती पाहू लागला. ️‍️ अनेक जाहिरातींमध्ये त्याला एक अतिशय आकर्षक जाहिरात दिसली.जाहिरातीत एका सुंदर घराचे फोटो होते – प्रशस्त हॉल ️, आधुनिक इंटिरियर ️, आणि गच्चीतून दिसणारा हिरवळ असलेला निसर्गदृश्य . सगळ्या गोष्टी त्याच्या अपेक्षेप्रमाणे होत्या, आणि भाडंही खूपच कमी होतं. जाहिरातीत दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्याने तातडीनं कॉल केला. फोनवर एका गोड बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला घरमालक म्हणून ओळख दिली. तो म्हणाला, “मी सध्या ...Read More