आरोपी

(53)
  • 171.1k
  • 23
  • 97.4k

पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी सौम्याकडे बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या हॉटेलचा मालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती “कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?” मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं “एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला “आणि आमची सर्विस कशी आहे?” “एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला. “मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या सर्विस बद्दल विशेषत्वाने विचारायचं कारण असं की तुम्हाला आत्ता जी मुलगी वेट्रेस म्हणून सर्विस देते आहे तिने तुमचं टेबल मुद्दामून दुसऱ्या वेट्रेस कडून मागून घेतलंय” “म्हणजे? मी नाही समजलो” पाणिनी म्हणाला. “म्हणजे असं की आत्ता जी मुलगी तुमच्यासाठी तुम्ही दिलेले खाद्यपदार्थ घेऊन आली ती मुलगी तुमच्या टेबलावरची वेट्रेस नव्हती. तुमच्या टेबलावरची वेट्रेस वेगळीच आहे. शेजारच्या वेट्रेस ने तुमच्या टेबलावरच्या वेट्रेस कडून तुमचं टेबल मुद्दामून मागून घेतलय”.

Full Novel

1

आरोपी - प्रकरण १

आरोपीप्रकरण १ पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या हॉटेलचा मालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती“कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?”मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं“एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला “आणि आमची सर्विस कशी आहे?”“एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला.“मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या ...Read More

2

आरोपी - प्रकरण २

प्रकरण २ दुसऱ्या दिवशी ऑफिस उघडलं तेव्हा दहा नंतर सौम्या चा इंटरकॉम पाणिनी पटवर्धनांच्या केबिन मध्ये वाजला. “बाहेर मिस आली आहे.” सौम्या म्हणाली “मिस अलुरकर कोण?” पाणिनी ने कपाळावर आठ्या घालत विचारलं. “सर. मिस अलुरकर म्हणजे काल आपल्याला भेटलेली वेट्रेस, क्षिती अलुरकर. तुमचा अंदाज बरोबर ठरला सर, ती आली आज ऑफिसला.” “अरे वा ! तिला आत पाठव सौम्या, आणि तू ही ये.” “मिस्टर पटवर्धन मी खरंच माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, तुमचे कसे आभार मानू मला समजून घेतल्याबद्दल ! आणि आजची अपॉइंटमेंट दिल्याबद्दल” पाणिनी हसला, “मला वाटतं किती मी दिलेली टीप पुरेशी होती कालची?” क्षिती ने आपल्या पर्समधून ...Read More

3

आरोपी - प्रकरण ३

प्रकरण तीन “किती पैसे होते त्यात?” - पाणिनी “काही सांगता येणार नाही पन्नास,पाचशे आणि दोन हजाराच्या च्या नोटा होत्या “आणि इतर खोक्यात काय होतं?” “मला माहित नाही. मी खोकं बंद केलं आणि कपाटाचं दार ही बंद केलं. मला भीती वाटते पटवर्धन सर, जर का काही चोरी दरोडा पडला घरात..... आम्ही दोघीच बायका घरी राहतो. म्हणजे लक्षात येत आहे ना... आणि अगदी दरोडा किंवा चोरीच सोडा जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारची रोख रक्कम खोक्यांमध्ये भरून घरी ठेवतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी सुद्धा ही रक्कम ठेवलेली असू शकते. जर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कळलं तर काय होईल?” ...Read More

4

आरोपी - प्रकरण ४

प्रकरण चार कनक ओजस ची विशिष्ट प्रकारे दारावर केलेली टकटक पाणिनीने ऐकली त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. सौम्या दरवाजा उघडला आणि कनक आत आला. “ हाय कनक ,आता मी सगळं आवरून निघायच्या तयारीत होतो.” पाणिनी म्हणाला. “मला अंदाज होताच तो की तू आज लवकर ऑफिस बंद करून तुझ्या या चिकण्या सेक्रेटरी ला घेऊन कुठेतरी कॉफी हाउस मध्ये जाऊन बसणार असशील. माझ्या वाट्याला तुझ्या खर्चाने खादाडी करायचं भाग्य कधी लागणार आहे कोण जाणे.” “बर बोल, काय विशेष ?” पाणिनी न विचारलं “काही नाही, असे काही प्रसंग घडलेत की त्यामुळे मलाच कोड्यात पडल्यासारखं झालंय.” “काय घडलय विशेष?”- पाणिनी न विचारलं ...Read More

5

आरोपी - प्रकरण ५

प्रकरण ५ “मिस्टर पटवर्धन मला असं इथून लगेच निघता येणार नाही. मी माझ्या खोलीतून काही आणले नाहीये. म्हणजे अगदी घासायचा ब्रश टूथपेस्ट सुद्धा घेतलेलं नाहीये.” क्षिती म्हणाली “टूथ ब्रश आणि टूथपेस्ट पेक्षा इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्येत. आपण निघतोय.” पाणिनी म्हणाला “तुझ्याबरोबर तू तुझी पर्स घेतलेली दिसतेस !” “हो. एवढ्या सगळ्या त्या गोंधळात आणि हातघाईच्या लढाईत मी पर्स मात्र घेतली.”-क्षिती “किती मोठी लढाई झाली?” - पाणिनी “शारीरिक लढाई नाही पण तोंडा तोंडी खूप झाली.”-क्षिती “आणि तू काय सांगितलंस त्यांना?” “मी काही सांगितलं नाही. तुम्ही जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढं फक्त सांगितलं. मी सांगितलं की मी काहीही पैसे चोरले ...Read More

6

आरोपी - प्रकरण ६

आरोपी प्रकरण ६ साहिर सामंत ने दाराची बेल वाजल्याचा आवाज ऐकला. दार उघडलं तर दारात पाणिनी आणि सौम्या उभे पाहून तो चकितच झाला. “ तुम्ही पुन्हा इथे?” “ मला वैयक्तिक, मधुर महाजन यांना भेटायचं आहे.” पाणिनी म्हणाला. “ त्या आता कोणालाही भेटू शकत नाहीत.”-साहिर “ तुम्ही तिच्या वतीने बोलताय का? म्हणजे तिचे वकील किंवा प्रतिनिधी म्हणून काम करताय का?” पाणिनी नं विचारलं “ ती कोणालाही भेटणार नाही.”-साहिर “ म्हणजे तिने तुम्हाला सांगितलं नाहीये तर, की ती कोणालाही भेटणार नाहीये म्हणून !” पाणिनी म्हणाला. “ अर्थात मला तिनेच सांगितलंय.” “ याचा अर्थ तुम्ही तिच्या संपर्कात आहात ?” पाणिनी नं विचारलं ...Read More

7

आरोपी - प्रकरण ७

प्रकरण ७ दुसऱ्या दिवशी दुपारच्या आधी थोडा वेळ कनक ओजस ने पाणिनी च्या ऑफिस च्या दारावर विशिष्ट प्रकारे टकटक ने दार उघडून त्याला आत घेतले. “ मला दोन-तीन गोष्टी सांगायच्या होत्या, म्हंटलं स्वतःच जाऊन सांगाव्यात.”-कनक “ बोल ना.काय आहे?”पाणिनी नं विचारलं “ पाहिली गोष्ट म्हणजे, मधुरा खरं बोलते आहे. तिने खरंच जनसत्ता बँकेतून तिच्या खात्यातून सहा हजार रुपये काढले आहेत.ती त्या खात्यात अधून मधून थोडे थोडे पैसे भरत असते.पैसे काढताना तिने करकरीत पाचशे आणि दोन हजार च्या नोटांची मागणी केली होती असं कळलंय.” पाणिनी च्या कपाळावर आठ्या पडल्या. “ पाणिनी याचा अर्थ चोरीचा कांगावा करायचा असा तिचा आधी पासूनच ...Read More

8

आरोपी - प्रकरण ८

प्रकरण ८ ग्लोसी कंपनीच्या परिसरात गाडी लावल्यावर दोधे जण लॉबी मधे आले.तिथे साधारण तिशीतली एक तरतरीत अशी मुलगी रिसेप्शन ला होती.तिच्या मागील बाजूला टेलिफोन ऑपरेटर मुलगी आपल्या कामात व्यग्र असलेली दिसत होती. कनक तिच्याकडे गेला आणि हसत म्हणाला, “माझ्या मित्राला घेऊन परत आलोय मी.” “ अजून तुम्हाला त्या पेन्सिली विकणाऱ्या अंध बाई मधे रस आहे?” ती रिसेप्शनिस्ट म्हणाली. “ तुम्ही पोलीस आहात की काय? तिला अटक करायला आलाय, भीक मागते वगैरे कारणास्तव?” “ आम्हाला फक्त उत्सुकता आहे.म्हणून आलोय.” पाणिनी म्हणाला. “ ते ठीक आहे पण तुम्ही पोलीस वाटत नाही, तुमच्या सारखे साहेबी घराण्यातले ,फक्त उत्सुकते पोटी इथे येतील हे....अरे ...Read More

9

आरोपी - प्रकरण ९

प्रकरण ९ दुपारी साडे तीन ला सौम्या ने पाणिनी च्या केबिन मधे आलेला रिसेप्शनिस्ट चा फोन उचलला. “ क्षिती आल्ये.” “बोलव तिला आत,सौम्या.” आत आल्यावर क्षिती हसून पाणिनी ला म्हणाली, “राजे साहेबांनी सांगितलं की तुम्ही मला भेटायला सांगितलंय म्हणून. काय झालंय अचानक?” “ मी आणि कनक ओजस एक छोटी ट्रीप करून आलो आत्ता.” पाणिनी म्हणाला. “ आपल्या प्रकरणा संदर्भात?” “ अर्थात.” “ काय प्रगती झाल्ये , काही नवीन बातमी समजल्ये?” “ त्या आधी मला, काही प्रश्न विचारायचे आहेत तुला.” पाणिनी म्हणाला. तिने संमती दर्शक मान हलवली. “ आज तुझं आत्याशी बोलणं झालंय?” तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. “ ...Read More

10

आरोपी - प्रकरण १०

प्रकरण १० तारकर क्षिती ला घेऊन गेल्यावर काही वेळेतच पाणिनी चा फोन वाजला.अलीकडून कनक ओजस बोलत होता “ पाणिनी, दोघांनी ग्लोसी कंपनीच्या बाहेरच्या वाहनांचे नंबर लिहून घेतले होते , त्या सर्वांचे मालक कोण ते मला समजलंय.त्यातला एक मालक चंद्रवदन विखारे आहे.त्याचा पत्ता आणि फोन माझ्याकडे आहे.बोलायचं आहे तुला?”-कनक “अत्ता नाही. नंतर. माझ्या अशीलावर, क्षिती वर खुनी हल्ला केल्याचा आरोप झालाय आणि तिला अटक झाल्ये.आपण आधी त्या फुगीर पायाच्या अंध बाईला भेटू.बघू तिला म्हणायचंय ते.तू तातडीने तयार रहा. पुढच्या तीन मिनिटात तुझ्या ऑफिस ला येतो मी.” “ ठीक आहे.”-कनक “ या तीन मिनिटात तू तुझ्या माणसांना निरोप दे की शेफाली ...Read More

11

आरोपी - प्रकरण ११

प्रकरण ११ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाणिनी च्या ऑफिस मध्ये ,पाणिनी, सौम्या, कनक कॉफी पीत बसले होते. “ तुझ्या माणसांकडून काय समजलं? त्या सारिकाच्या घरात कोणी आलं होतं?” “ नाही. रात्र तशी भाकड गेली,पाणिनी.काहीच घडलं नाही.” तेवढ्यात कनक ला फोन आला. बराच वेळ तो बोलत राहिला. “ नाही, त्यांना काम चालूच ठेवायला सांग.” कनक फोन मधून सूचना देत म्हणाला. “ पाणिनी, ती अंध महिला पुन्हा आपल्या कामावर हजर झाल्ये !” “ का sssय ! ” पाणिनी ओरडला. “ मला अत्ता ओच फोन आला होता,पाणिनी.” “ कुठे हजर झाल्ये कामावर?” “ नेहेमीच्या जागी.ग्लोसी कंपनीच्या आवारात.” “ दोघींपैकी जाण्या सारखी ...Read More

12

आरोपी - प्रकरण १२

दुपारी चार ला पाच मिनिटे असतानाच पाणिनी ने क्रिकेट क्लब च्या मैदानात प्रवेश केला. मुद्दामच तो उभा राहून मैदान उभा राहिला. जणू काही अनेक वर्षांनंतर तो तिथे आला होता आणि आपल्या आठवणीना उजाळा देत आपल्या डोळ्यात ते वातावरण साठवत होता. हळू हळू चालत तो क्लब च्या ऑफिस च्या दिशेने निघाला. पायऱ्या चढून तो वर आला आणि थोडा घुटमळला. त्याला बघून एक माणूस बाहेर आला. “ यस ? कोण हवय? ” “ मी पटवर्धन. मी फोन वर इथल्या सिनियर कोच शी बोललो होतो.” पाणिनी म्हणाला. “ कशा बद्दल?” “ आम्हाला क्रिकेट खेळायचंय, मैदान बुक करायचं होत.” पाणिनी म्हणाला. “ सालढाणा ...Read More

13

आरोपी - प्रकरण १३

प्रकरण १३ अंधार पडून बऱ्यापैकी वेळ झाल्यावर पाणिनी आणि कनक ओजस ने गाडी मधुराच्या घरापासून जरा दूर उभी केली चालत चालत घराच्या दिशेने निघाले. “ तर मग कनक, आपण आता मनात काहीही किंतू ण आणता दारा समोर जायचंय, किल्ली लाऊन कुलूप उघडायचं, आत हॉल मधे गेल्यावर उजव्या बाजूच्या जिन्याने सरळ वरच्या मजल्यावर जायचं.वर गेल्यावर उजव्या बाजूला क्षिती ची खोली रस्त्याच्या बाजूला आहे.तिथे जाऊन दीर्घ काळ वाट बघत बसायचं.या गोष्टीची मानसिक तयारी ठेवायची ! ” “ फार वेळ वाट बघायला लागेल आपल्याला असं मला वाटत नाही.”-कनक ओजस म्हणाला. “ कारण मला मिळालेल्या माहिती नुसार, सालढाणा ने ग्रीष्म चे क्रिकेट किट ...Read More

14

आरोपी - प्रकरण १४

प्रकरण १४ “ तर मग पाणिनी काय करायचं आपण?पोलीसांना कोळून लाऊन आपण त्या घरात पुन्हा जायचं?”—कनक “ नाही. साहीर आता तसा त्यात अर्थ राहिला नाही. दुसरं म्हणजे, आपल्यावर नजर तेवण्यासाठी त्यांनी एव्हाना सध्या वेशातला पोलीस नेमला असेल.” पाणिनी म्हणाला. “ त्यांना काय अपेक्षित असेल अत्ता?” “ आपण पुन्हा तिथे जाऊ हेच अपेक्षित असेल.आपले कुठलेली खुलासे तारकर ला पटले नसतील. त्याला, त्या घराबद्दल काहीतरी संशय आहे. कट ते त्याला माहीत नाहीये पण तो शोधायच्या......हे बघ कनक , तुला ती गाडी दिसत्ये समोर? मागच्या दिव्या जवळ पोचा आलेली? ” पाणिनी न विचारलं “ हो. त्याचं काय?” “आपल्याला जेव्हा पोलीस त्यांच्या गाडीने ...Read More

15

आरोपी - प्रकरण १५

प्रकरण १५ न्यायाधीश मंगरूळकर आपल्या बाकावर स्थानापन्न झाले.अत्यंत न्यायप्रिय, विचारी आणि वस्तुनिष्ठ असा त्यांचा लौकिक होता. आपल्या अंगाभोवती चा त्यांनी सारखा केला आणि समोर बसलेल्या सगळ्या लोकांकडे आणि वकिलांकडे एक दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य विरुद्ध क्षिती अलूरकर असा हा खटला आहे. तिच्या वर आरोप आहे की खुनाच्या उद्देशाने हातात हत्यार घेऊन हल्ला करणे. दोन्ही बाजूंचे वकील तयार आहेत?” हेरंभ खांडेकर, सरकारी वकील उठून उभे राहिले. “ इफ द कोर्ट प्लीज, आम्ही सरकार पक्ष तयार आहोत. मला एवढेच प्रतिपादन करायचं आहे की एका तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आलेला आहे. हा प्राथमिक खटला आहे आणि त्याचा ...Read More

16

आरोपी - प्रकरण १६

प्रकरण १६ कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन कनक कडे वळला, “कनक तुझ्या लक्षात आले का?” तो एकदम एक्साईट होऊन “काय लक्षात आलय का?” “अरे सगळंच चित्र स्पष्ट झालंय. येतंय का लक्षात? तो साहिर सामंत खरं बोलत होता ! संपूर्ण सत्य नाही पण खूपसं खरं बोलत होता. आता माझ्या लक्षात आले आपल्याला नक्की काय करायचे ते कोणाशी आपली गाठ आहे ते.”” “काय लक्षात आलय पण तुझ्या पाणिनी?” “अरे तो वॉटर कुलर हलवला गेला होता.” “हलवला गेला होता म्हणजे? आणि त्या वॉटर कुलर च काय?” “अरे ,मधुरा महाजन च्या बेडरुममध्ये वॉटर कुलर होता.. बहुदा ती शुद्ध केलेले पाणी फक्त पीत असावी ...Read More

17

आरोपी - प्रकरण १७

न्यायाधीश मुळगावकरांनी आपला अंगावरचा झगा जरासा सारखा वरून घेतला. “ मिस्टर खांडेकर मला असं समजलं की मागच्या वेळेला कोर्ट तहकूब केल्यापासून बऱ्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या क्षिती आलूरकर च्या प्रकरणात?” “अगदी बरोबर आहे युवर ऑनर. त्याच अनुषंगाने मला इन्स्पेक्टर तारकर यांना साक्षीसाठी पुन्हा पिंजऱ्यात बोलवायचे आहे” खांडेकर म्हणाले. इन्स्पे.तारकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुन्हा उभा राहिला. त्याला सरकारी वकिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांने सांगितलं की त्यांन आणि त्याच्या हाताखालच्या पोलिसांने मधुरा महाजन च्या घरी अचानक धाड टाकली. त्या वेळेला त्याला कार्पेट च्या खालच्या चोर कप्प्यात मोठी रोख रक्कम ठेवलेली दिसली. ते जेव्हा आत शिरले त्यावेळेला पाणिनी पटवर्धन ...Read More

18

आरोपी - प्रकरण १८ शेवटचे प्रकरण

अर्ध्या तासाने न्या.मंगरुळकर आपल्या आसनावर येऊन बसले. “ विखारे यांची सर तपासणी पूर्ण झाल्ये का तुमची?” त्यांनी पाणिनी ला “ पूर्ण नाही झाली खरं तर, पण तो कोर्टात हजर नाहीये. पण तारकर इथे आहे, त्याला मी काही प्रश्न विचारू इच्छितो.” & इन्स्प.तारकर पिंजऱ्यात हजर झाला. “ तुझो ठशांची तुलना पूर्ण झाली का? काय निष्कर्ष आहेत तुझे?” “स्टील च्या पॅड वरचे विखारेचे ठसे हे कुलर आणि बॅटरी वरच्या ठशांशी तंतोतंत जुळले.” तारकर उत्तरला. “ अत्ता विखारे कुठे आहे तुला माहिती आहे?” पाणिनी ने विचारलं. “ अगदी अद्ययावत ठाव ठिकाण माहिती आहे त्याचा.” –तारकर. “ सांग.” “ कोर्टातून अर्ध्या तासापूर्वी बाहेर ...Read More