रांगड कोल्हापूर

(6)
  • 17.5k
  • 0
  • 7.5k

"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने.."रातच्याला घरी या ..."नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, तिकीट आहे रात्रीच्या ट्रेनचे"यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय"इकडं पावणा आला की दोन चार दिस राहतूया बगा.."राजेंद्र, घिऊन ये पावण्यासनी संध्याकाळच्याला.."अस्सल कोल्हापुरी भाषेत आमच्या पाहुणचाराला सुरवात झाली..राजेंद्रच्या( अनिलचा मित्र) घरी आलो... त्याची बायको राणी , माझीही मैत्रीण.. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत.."आज खूप वर्षांनी आलासा बगा.." आर्याला आणायचं होतसा.. पोरांनी चिक्कार मजा केली असती .."अगं, आर्याचे बारावीचे क्लास आहेत.. म्हणून नाही आली.."हर्ष आणि छोटा कसा आहे तुमचा.."हर्ष शांत आहे बगा.. पण बारका कधी कधी लई वांडगिरी करतंय..त्याला विजापूरला टाकला सैनिक शाळेत....."अस आमचं

Full Novel

1

रांगडं कोल्हापूर .. भाग १

"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने..""रातच्याला घरी या ...""नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, आहे रात्रीच्या ट्रेनचे""यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय""इकडं पावणा आला की दोन चार दिस राहतूया बगा..""राजेंद्र, घिऊन ये पावण्यासनी संध्याकाळच्याला.."अस्सल कोल्हापुरी भाषेत आमच्या पाहुणचाराला सुरवात झाली..राजेंद्रच्या( अनिलचा मित्र) घरी आलो... त्याची बायको राणी , माझीही मैत्रीण.. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत.."आज खूप वर्षांनी आलासा बगा.."" आर्याला आणायचं होतसा.. पोरांनी चिक्कार मजा केली असती ..""अगं, आर्याचे बारावीचे क्लास आहेत.. म्हणून नाही आली..""हर्ष आणि छोटा कसा आहे तुमचा..""हर्ष शांत आहे बगा.. पण बारका कधी कधी लई वांडगिरी करतंय..त्याला विजापूरला टाकला सैनिक शाळेत....."अस आमचं ...Read More

2

रांगडं कोल्हापूर .. भाग २

आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...अनिल छत्री उघडणार इतक्यात,"आरं , भिजं की मर्दा थोडंएवढं भिजल्यानं तुज्या मोड नाय येणार !!"राजेंद्रने जी कोपरखळी मारली त्याने मलाही हसू आलं..गाडीशी पोहचेपर्यंत मस्त कोल्हापूरचा पाऊस एन्जॉय केला..आता वेध लागले होते , जोतिबाच्या दर्शनाचे!!ऐन जून महिन्यात आम्ही देवाच्या भेटीला चाललो होतो.. त्यामुळं कधी पावसाची रिपरिप तर कधी मध्येच मुसळधार.....त्याच्या मनाला येईल तसा तो बरसत होता आणि त्याच्या सोबतीला दाट धुकं !!जोतिबाचा घाट ऐन पावसाळ्यात चढताना थोडी काळजी घ्यावी... वाकडी तिकडी वळणे आणि अचानक समोरून येणारी वाहनं , नवखा माणूस नक्कीच भांबावून जाईल...घाटमाथ्यावर सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून , तिथून दिसणारे कोल्हापूर शहर ...Read More