लव्ह मी फॉर अ रिझन लेट द रिझन बी लव्ह

(199)
  • 154.5k
  • 46
  • 65k

’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या विचीत्र प्रश्नाने भंग पावली. अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??” “हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज स्थिर ठेवत म्हणाली.. “हे असे अजुन किती दिवस चालवायचे? तुला पैसे देऊन देऊन मी कंटाळले आहे. महागड्या गाड्यांची फ्रॅन्चायजी घ्यायचे तुझे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही ये का?” किती दिवस जुगार आणि लॉटरीतुन मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नाच्या मोहापायी तु माझे कष्टाचे पैसे असे बरबाद करणार आहेस? किती दिवस मी तीच कंटाळवाणी नोकरी करत रहायची? आयुष्यभर नोकरी करुन असे कितीसे पैसे हाती लागणार?

Full Novel

1

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)

’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या प्रश्नाने भंग पावली. अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??” “हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज स्थिर ठेवत म्हणाली.. “हे असे अजुन किती दिवस चालवायचे? तुला पैसे देऊन देऊन मी कंटाळले आहे. महागड्या गाड्यांची फ्रॅन्चायजी घ्यायचे तुझे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही ये का?” किती दिवस जुगार आणि लॉटरीतुन मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नाच्या मोहापायी तु माझे कष्टाचे पैसे असे बरबाद करणार आहेस? किती दिवस मी तीच कंटाळवाणी नोकरी करत रहायची? आयुष्यभर नोकरी करुन असे कितीसे पैसे हाती लागणार? ...Read More

2

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २)

तुझे तिच्याशी लग्न झाल्यावर काही महिन्यांनी तु तिचा खुन करायचा. पण हा खुन नसुन एक अपघात होता असे आपण आहोत. तिच्या मृत्युनंतर तिच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि मालमत्तेचा सर्वेसर्वा तुच होशील. तीच संपत्ती इतकी आहे की तो पैसा नुसता खर्च करत बसायचे म्हणले तरी तुझे अर्धे आयुष्य खर्ची पडेल. मेहता जो पर्यंत आहेत तो पर्यंतच, त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसही तुच असणार आहेस” “..पण नैना हे सर्व जरा अधीक तपशीलात सांगीतले असतेस तर बरं झालं असते. हा वरवरचा प्लॅन ऐकुन मला तरी त्याची खात्री वाटत नाही..”, जोसेफ “सांगेन, सर्व काही प्रत्येक बारकाव्यासहीत सांगेन. आपण तिघंही ह्या प्लॅनबद्दल जो पर्यंत पुर्णपणे ...Read More

3

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ३)

नैनाने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली .. “सकाळी ११.०० वाजता “वर्ल्ड मनी” बॅकेचे जी.एम. येणार आहेत. आपण हाताळत नविन ऑटोमोबाईल प्रोजेक्टचे सर्व व्यवहार त्यांच्या बॅकेमार्फत व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याबाबत आपणास बॅक देऊ करत असलेल्या सुविधांबद्दल आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ते येणार आहेत. ह्या… ” “मिटींग कॅन्सल कर.. ” रोशनी म्हणाली. “.. पण मॅडम, श्री अविनाश वर्मा त्या बॅकेचे जि.एम आहेत आणि..” “नेक्स्ट.. ” रोशनी म्हणाली.. “ओ.के मॅम.. १२ वाजता ‘कुल इंटीरेअर्स’ च्या मिस् भावना प्लॅंन्टच्या इंटेरिअर्सचे फायनल ड्राफ्ट्स घेउन येणार आहेत…”, नैनाने एक प्रश्नार्थक नजर रोशनीकडे टाकली आणि पुढे वाचायला सुरुवात केली.. “१.३० वाजता ...Read More

4

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ४)

“मॅडम, त्या व्यक्तीचे नाव ’जोसेफ’ असे आहे. ’हेल्पलाईन’ मध्ये तो एक महीन्यापुर्वीच स्वयंसेवकाच्या पदासाठी भरती झाला. लहानपणापासुन तो अनाथच सिंधुताईंच्या.. हेल्पलाईनच्या प्रमुख, म्हणण्यानुसार जोसेफ आपल्या कामात चोख आणि प्रामाणिक आहे. संस्थेमध्ये काही दिवसांतच तो अनेक विद्यार्थ्यांचा लाडका झाला आहे. कुठल्याही प्रकारचे काम करण्यात तो मागे-पुढे पहात नाही. ह्या पुर्वी त्याचे स्वतःचे गॅरेज होते, पण परीस्थीतीमुळे त्याला ते विकावे लागले. काही ठिकाणी त्याने ड्रायव्हरचेही काम केले आहे. यापुर्वी करत असलेल्या कामाच्या ठिकाणांचे हे काही रेफरंन्सेस आणि रेकमंडेशन लेटर्स..”, असे म्हणुन नैनाने काही कागदपत्रांच्या प्रती रोशनीच्या समोर ठेवल्या. रोशनीने सर्व कागदपत्रं कागळीपुर्वक वाचली आणि मग ती नैनाला म्हणाली, “हे बघ नैना, ...Read More

5

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ५)

म्हणायला रोशनीच्या महालात माणसांचा राबता होता परंतु रोशनीवर माया करणारे कोणीच नव्हते. आपल्या लाडक्या मालकीणीच्या मृत्युस ही सावळी, लंगडी कारणीभुत आहे अश्या काहीश्या बुरसटलेल्या विचारांनी नोकरवर्गाने सुध्दा तिच्यावर आपला जिव ओवाळुन टाकला नाही. मेहतांसमोर सर्वजण रोशनीच्या मागे-पुढे करत. परंतु त्यांच्या मागे मात्र रोशनी त्यांच्या लेखी अस्तीत्वातच नव्हती. रोशनी मोठी होत गेली आणि तिचे जग संकुचीत गेले. आपल्या बेढब रुपाला बुजुन ती बाहेर पडेनाशी झाली. तिचा स्वभाव एकलकोंडा होत गेला. मेहता आपल्याच कामात मग्न होते. त्यांच्याकडे रोशनीसाठीच काय, स्वतःसाठीसुध्दा वेळ नव्हता. लहानपणापासुनच प्रेमाला पारखी झालेली रोशनी मनोमन प्रेम काय आहे हे माहीत नसतानाही खर्‍याप्रेमासाठी तरसत राहीली. परीकथांमध्ये असलेला राजकुमार एकदिवशी ...Read More

6

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ६)

मेहतांबरोबरची मिटींग छान झाली. जोसेफच्या कल्पना आणि प्लॅन्समुळे स्वतः मेहता आणि रोशनी दोघेही भारावुन गेले होते. रोशनीतर कधी नव्हे एखाद्या लहान मुलीसारखी ए़क्साईट झाली होती. कधी एकदा आपले हे फॅन्सी शोअरुम पुर्ण होतेय असे तिला झाले होते. जोसेफ हॉटेलमध्ये आला तेंव्हा कमालीच्या तणावाखाली होता. पण मेहतांच्या दिलखुलास वागण्याने त्याच्या मनावरील दडपण कमी झाले. “रोशनी अगदीच काही वाईट नाही”, जोसेफ विचार करत होता..”लुक्स वाईज.. येस..बट शी गॉट ब्रेन्स.. नो वंडर, मेहतांनी ऑटोमोबाईल प्रोजेक्ट निर्धास्तपणे रोशनीवर सोपवला होता. व्हॉट अ वेस्ट..काही दिवस…ऍन्ड देन.. आय हॅव टु हुक हर.. ऍन्ड देन.. आय हॅव टु किल हर..” *********** ..”मला माफ करा हं..मला ...Read More

7

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ८)

रोशनीच्या त्या रॉयल बेडवर नैना आणि जोसेफ एकमेकांना बिलगुन पहुडले होते. “वॉव, व्हॉट अ फन राईड इट वॉज..”, नैना रोशनीला कळालं नं हे, तर मला कच्चे खाईल ती..” स्वतःशीच हसत ती म्हणाली, “बिच्चारी, लग्न झालं नाही की लग्गेच जावं लागलं तिला आणि ते पण थोडे थोडके नाही, एक महिन्यासाठी.. असो..रोशनी इथे नसताना तिचे वकील.. मि. फर्नांडीस ह्यांना एकदा भेटुन घे. त्यांच्याशी ओळख करुन घे. त्यांना सांग रोशनीची विमा पॉलीसी काढायची आहे. त्यांना दाखवुन दे की तुझे रोशनीवर कित्ती प्रेम आहे. ते इथे असतानाच रोशनीला एकदा फोन कर, तिच्याशी गोड गोड बोल. तसेच त्यांच्याकडुन इतर काही माहीती जसे रोशनीचे काही ...Read More

8

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ९)

रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन गेला होता. आजपर्यंत अनेक तरूणींना त्याने बिछान्यामध्ये ओढले होते, पण रोशनीबरोबरचा हा अनुभव त्याच्यासाठी त्या सर्वांपेक्षा सरस होता रोशनीचे नविन रुप पाहुन सारेच जण हरखुन गेले. बेढब, जाड-जुड, एकलकोंडी, खडुस चेहर्‍याच्या रोशनीच्या जागी एक मध्यम बांध्याची, हसतमुख, सर्वांशी मिसळणारी हीच का ती रोशनी असाच प्रश्न सर्वांच्या चेहर्‍यावर होता. आणि जोसेफ? त्याला तर स्वर्ग दोन बोटं उरला होता. सत्ता, अमाप संपत्तीच्या जोडीने त्याला एक स्वरुप पत्नी मिळाली होती. “काय गरज आहे मला ...Read More

9

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १०)

समोरच्या बेडवर एक तरूणी अस्ताव्यस्त स्थीतित मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यातुन रक्ताचा पाट वाहत जमीनीवर पसरला होता आणि त्यामध्येच उभा होता. त्याचे लक्ष हातातल्या लोखंडी रॉडकडे गेले जो त्या तरूणीच्या रक्ताने माखला होता. ह्याच रॉडने त्या तरूणीचा खुन झाला होता हे कुठलंही शेंबड पोरगं सांगु शकले असते. भिंतीवर दिव्याच्या बटनांचा शोध घेताना लागलेले रक्ताने माखलेले जोसफच्या हाताचे ठसे विखुरले होते. हा सर्व प्रकार पाहुन जोसेफ भांबावुन गेला. त्याने तो रॉड टाकुन दिला आणि तो सावकाश त्या तरूणीपाशी गेला. हळुवार त्याने त्या तरूणीचा चेहरा वळवला आणि नकळत त्याच्या तोंडुन उद्गगार बाहेर पडले…”सोनी!!!” आश्चर्याचा, भितीचा तो धक्का सावरत होता तोच ...Read More

10

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती. खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली. “गुड मॉर्नींग डीअर..”, उठुन बसत जोसेफ म्हणाला “चल पटकन तयार हो, आणि दिवसांतली कामं संपवुन टाक..”, रोशनी म्हणाली.. “का? काय झालं?”, जोसेफ “अरे का काय? संध्याकाळी जायचे आहे ना पार्टीला संध्याकाळी. मला कुठलीही कारणं नक्को आहेत बरं का..”, लटक्या रागाने रोशनी म्हणाली…”आयुष्यात मी खुप पार्टीज मिस्स केल्या आहेत, पण आता तु बरोबर असताना त्याच पार्ट्या मी खुप एन्जॉय करते आहे..” केसांची बट कानामागे सारत रोशनी म्हणाली. “हो डिअर, मी ...Read More

11

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १२)

“रोशनी.. प्लिज माझ ऐक.. मी नाही म्हणतं जे झालं, तु जे पाहीलेस ते खोटे आहे म्हणुन. पण माझ्यात खरंच झालाय रोशनी. मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. मला तुला मारण्याची अज्जीब्बात इच्छा नाही रोशनी.. पण..” असं म्हणुन जोसेफने ते जे.के प्रकरण, सोनीचा खुन ह्याबद्दलचे सर्व रोशनीला सांगीतले. “आय पिटी यु जोसेफ.. पण मला तुझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही. तु ह्या प्रकरणातुन कसं बाहेर पडायचं तो तुझा प्रश्न आहे. यापु्ढे तुझा आणी माझा काहीही संबंध नाही जोसेफ. दोन चार दिवसांत तुला घटस्फोटाचे पेपर्स मिळतीलच पण त्यानंतर रोशनी एन्टर्प्रायझेसच्या कुठल्याही व्यवसायात तुझा काडीचाही संबंध किंवा हक्क रहाणार नाही. तुला आत्ताही माझ्या ...Read More

12

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १३) - अंतिम भाग'

जोसेफला जाग आली तेंव्हा त्याला जाणवले की कुठल्याश्या गाडीतुन त्याला कुठे तरी न्हेण्यात येत होते. त्याचे दोन्ही हात आणि बांधलेले होते. बाहेर बर्‍यापैकी फटफटायला लागले होते. जोसेफ डोळे मिटुन अंदाज घेउ लागला. “ख्रिस, तु ह्याला मारलेस एवढे जोरात, हा मेला बिला तर नाही ना?” ख्रिस ड्रायव्हिंगसिटवर बसुन गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी बसलेला एक इसम ख्रिसला विचारत होता. “नो बड्डी.. जेंह्वा मी एखाद्याला बेशुध्द करतो तेंव्हा तो बेशुध्दच होतो. तो नक्कीच मेलेला नाही अजुन २०-२५ मिनिटांमध्ये येईल शुध्दीवर. तसेही बॉसने सांगीतले आहे की जोसेफ जिवंत पाहीजे. त्याला मरण्यापुर्वी कळायला हवे की तो का आणि कसा मरतो आहे ते..”, ...Read More

13

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ७)

रोशनीला दारात उभे पाहुन जोसेफने चेहर्‍यावर उसने आश्चर्य आणले. “मॅम!!!… तुम्ही.. इथे??”“काय झालं मि.जोसेफ?”“काही नाही मॅम, परवा घरी परतायला झाला होता, येताना गाडी पंक्चर झाली.. झाली काय, केली गेली. वाटेत खिळे टाकुन ठेवले होते. मी उतरुन चाक बदलतच होतो तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन चार-पाच भुरटे चोर आले आणि त्यांनी मला मारहाण केली..”“पोलीस कंम्प्लेंट केलीत मि.जोसेफ?”“नाही मॅम, तसे फार काही चोरीला नाही गेले..”“अहो पण.. एक मिनीट..” असे म्हणुन रोशनीने पर्समधुन मोबाईल काढला.. “मी ए.सी.पींना फोन लावते आहे, दे बेटर शुड लुक इन्टु इट..” आणि ती नंबर फिरवु लागली.. “इट्स ओके मॅम.. तसेही त्या चोरट्यांनी चेहर्‍यावर काळे बुरखे घातले होते, त्यांचे चेहरे ...Read More