मकर संक्रांत

(1)
  • 21.8k
  • 7
  • 8.4k

मकर संक्रांत भाग १ भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते . फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले.अशी ही कथा आहे . या तीन दिवसांच्या सणाची सौभाग्यवती महिला व नववधू आवर्जून वाट पाहत असतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी

Full Novel

1

मकर संक्रांत भाग १

मकर संक्रांत भाग १ भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते . फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले.अशी ही कथा आहे . या तीन दिवसांच्या सणाची सौभाग्यवती महिला व नववधू आवर्जून वाट पाहत असतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी ...Read More

2

मकर संक्रांत भाग २

मकर संक्रांत भाग २ संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:- या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या जी माणसं दान देतात त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तिळ-तांदुळ वाहतात. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.सुगडात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची ...Read More

3

मकर संक्रांत भाग ३

मकर संक्रांत भाग ३ संक्रांतीचा शेतीशी आणि सौरकालगणनेशी संबंध आहे . असं म्हणतात की संक्रांती नंतर येणाऱ्या रथसप्तमीपासुन रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात. या दिवशी आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधार्या माणसांसोबत पंतग उडविण्यात.बालगोपाळ तल्लीन असतात. भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. . . पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.या राज्यात पतंगाचे या सणाला खुप महत्व आहे . या पतंग उडविण्याचे ...Read More