आज स्मिता आरशा समोर उभी होती... स्वतःच रूप ती आरशात पाहत होती.... अगदी मराठमोळी नटलेली... हिरवी साडी... त्यावर लाल डिसाईनर शाल., केसांची अगदी सुंदर हेअरस्टाईल., नाकात नथ., हातावर भरगच्च भरून काढलेली मेहंदी.... आणि त्यावर हात भरून हिरव्या बांगड्या....आणि सर्वात मुख्य म्हणजे गळ्यात मंगळसूत्र..... हो मंगळसूत्रच......ज्याच तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता ते आज सत्यात उतरलेलं......एका कॉलेजमधील साध्या व्याख्यानाला त्याला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडलेली ती... तिला हे ही माहित नव्हत की पुन्हा त्याला पाहू शकेल का नाही.... पण आज तोच तिचा नवरा झालेला.... तिच सगळ काही झालेला.... तिला अजूनही विश्वास होत नव्हता.... ज्याच्यावर तिला पहिल्या नजरेत प्रेम झाल तो आज