---------मॅडम् कोणी रमेश पवार सर बाहेर आले आहेत. तुम्ही बोलावल्याचं ते म्हणाताहेत. हो... हो... थोडा वेळ बाहेर बसू द्या त्यांना. शिपायाने रमेश पवार बाहेर आल्याचे सांगितल्यावर रागिनीने हातातल्या पेनचे टोपण लावले. डोक्यावर चालणार्या पंख्याकडे तिचे लक्ष गेले. पंख्याच्या फिरणार्या पात्याप्रमाणे तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. ती भूतकाळात गेली....सुमारे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट... मैत्रिणींच्या गराड्यात नटून थटून रागिणी तयार होत होती. तिच्या अवतीभवती असणार्या मुलींचा हास्यविनोद सुरू होता. उद्या रागिणीला हळद लागणार होती, त्यामुळे तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी खास एका महिलेला बोलावले होते. ती तिच्या हातावर मेहंदी काढत होती. घराच्या समोरील ओसरीत एक महिला बायकांना बांगड्या भरत होती. त्यातील काही बायका