जी मुलगी झोपेतून उठल्यावर ही सर्वांची नजर आकर्षित करून घ्यायची ती मुलगी आज त्या पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये एक सुंदर परी दिसत होती . तिला बघताच क्षणी सगळेच आपल्या जागेवर उभे राहिले . आर्याला बघण्यासाठी प्रत्येकाच्या मनात कुतूहल होती. खरं तर त्याला दुसर ही कारण होतं पण आज वाढदिवस म्हणून या उद्देश्याने समजू या ! श्वेता आणि अनुराग ने ही तिच्या वर मॅचिंग असे कपडे घातले होते . स्टेज वर असलेला जोकर आर्या चे लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन कृती करत होता आणि ती ही खूप खुश झाली होती . तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी घेतलेली मेहनतीला फळ मिळालं होत .