पापक्षालन भाग 4 तत्पूर्वी महाराज आणि आचार्य यांची भेट घेणे निकडीचे होते. सेवक वर्गाच्या ताफ्यातून कटूभिल्ल, महाराजांच्या सेवेतील राजनिष्ठ घराण्यांपैकी चंडवर्धन यांचे वंशज अशी नेमकी मंडळी घेऊन तेजदत्त थिरुकोट्टाला रवाना झाले. कटू भिल्लाला पाहताच महाराजांना दुःखावेग आवरेना.तेजदत्तांच्या कर्तृत्वाची साक्ष त्यांना पुरेपूर पटली. आचार्यांसमोर अधोवदन तेजादत्तांना महाराज म्हणाले, “दत्त! आचार्यांचे पदवंदन करा.” लज्जित झालेले तेजदत्त कापऱ्या स्वरात म्हणाले, “हा देह अपवित्र आहे महाराज... .. . . . .” “वारांगनांचे बिभत्स कामोत्तेजक नेत्रांनी अवलोकिले आहेत. त्यांचे अपवित्र स्पर्श आणि मदिरा मांसाहाराने विटाळलेला आहे हा देह... . . . . देवतुल्य आचार्यांच्या मंगल चरणांना स्पर्श करण्याचे पावित्र्य आता माझ्याकडे उरले नाही, तात!” दत्तांचे