रिव्हॉल्व्हर - प्रकरण 14

  • 201
  • 51

प्रकरण १४या नंतर पियुष कर्नावट, ठसेतज्ज्ञ याला पाचारण करण्यात आले.“आरोपी ज्या घरात राहत होती त्या घराची ठसे मिळवण्याच्या दृष्टीने तपासणी करण्या चा प्रसंग तुझ्यावर आला होता का?”-खांडेकर. “ हो.” “कधी?” “९ ऑक्टोबरला” “तुला आरोपीच्या घरात कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले कपडे, कापड किंवा इतर कुठलीही वस्तू आढळली का?” “हो सर” पियुष म्हणाला.“कुठल्या वस्तूवर असे डाग आढळले?”-खांडेकर “ बुटाच्या जोडी पैकी डाव्या बुटाच्या तळव्यावर आणि टाचावर ” “हे डाग मानवी रक्ताचेच आहेत हे ठरवण्यासाठी आवश्यक असलेलं पुरेसं रक्त तुला तपासणीसाठी मिळालं का या बुटावरून? ” “ नाही सर ते बूट खूपच काळजीपूर्वक आणि खसखसून घासून धुतले होते. पण त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यावर असलेले डाग हे रक्ताचेच आहेत हे शोधून