चकवा - भाग 4

  • 549
  • 1
  • 240

चकवा भाग 4जरा हुषारी आल्यावर त्याने चौफेर नजर फिरवली. तुरीची ढाकं पुरुषभर उंच वाढलेली होती.  तटक्यांवर सोडलेले चवळी, तोवशीचे वेल फुलायला कागले होते. तोवशीच्या वेलावर वीतभर लांब कोवळ्या काकड्या धरलेल्या होत्या.  त्याने दोन काकड्या काढल्या. त्या पिशवीत टाकल्या नी कोवळी शिसं (अगदी छोट्या  काकड्या) चावीत  इकडे तिकडे बारीक नजरेने न्याहाळताना  ओथंबून धरलेला पडवळीचा वेल दिसला.  धाकुची  खरी म्हणतात ती हीच हे त्याच्या लक्षात आले. खरीचा सध्याचा रत्नू कुंभार गेले पंधरा दिवस  तीस चाळीस पडवळांचा भारा बांधून गावात नेवून विकीत असे . त्याने दोन पडवळी मोडून ती पिशवीत भरली. खरीतले जित्रब बघून त्याचे डोळेच फाटले. आता तो माघारी जायला निघाला. तो