चकवा - भाग 3

  • 537
  • 1
  • 198

चकवा भाग 3सकाळी उशिरा कौल प्रसाद घ्यायला सदू गुरव आणि सातेकजण देवळाकडे निघाले. टेंबावरून पुढे येवून चढण संपल्यावर  चिरेबंदी पाखाडी सुरु झाली. देवीचे देवूळ नजरेच्या टप्प्यात आले त्यावेळी डाव्या हाताला पाच साखर दाबोटे  पडलेले दिसले. मंडळी कुतुहलाने जवळ गेली. पोत्यांचे बंद सोडल्यावर आत  भांडी, सामान दिसले. रात्री बहुतेक देवळात चोरी झाली असा तर्क करून स्वत: सदू गुरव  चोरीची वर्दी द्यायला गावात गेला. तासाभरात एकेक करीत मंडळी जमू लागली. पोलिस पाटील आणि देवस्थानचे मुख्य मानकरी  दत्ताजी भावे यानी तालुक्याला जावून पोलिस स्टेशनला तक्रार करायची, तो पर्यंत कुणीही मुद्देमाल हलवायचा नाही असा निर्णय घेतला. मध्यान्हीपूर्वी पोलिस आले. मग पोती  मंदिरात नेली.  पोत्यातल्या