दंगा - भाग 5

  • 174

५                     केशरचं निलंबन झालं होतं. तरीही तो समाधानीही होता. मात्र त्याला आजही त्याचा गतकाळ आठवत होता. ज्या गतकाळात तो शिक्षक होता. त्याच काळात ऑनलाइन कामं करावी लागायची. वरुन संस्थाचालकाची कटकट सांभाळावी लागायची. तसा त्याच काळात तो शिक्षकांच्याच प्रश्नावर विचार करायचा. सध्या शिक्षकांसमोर जास्तची कामं सरकारनं दिली होती. ज्यात ऑनलाइन कामं होती. त्यामुळंच केशर विचार करायचा. अशी जर ऑनलाइन कामं शिक्षकांच्या पाठीमागे असतील तर शिक्षकांनी शिकवायचे कसे व विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे?          ऑनलाइन कामातून बरेच प्रश्न निर्माण झाले होते. शिकायचे कसे? हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न होता, तर शिकवायचे कसे? हा शिक्षकांसमोर प्रश्न