बी. एड्. फिजीकल भाग १९मग मी कुंभवडे हायस्कूलचे पत्र फोडले. तिथल्या हेड मास्तरनी मला जॉब ऑफर दिली होती. त्यांच्या हायस्कूलला इंग्रजी शिक्षकाचे पद रिक्तहोते. त्या साठी मी विचार करावा. तसेच सध्या काही आर्थिक अडचण असेल तर हजार दोन हजार रुपये पाहिजे तर ताबडतोब पाठवू असेही त्यानी कळविले होते. त्यावेळी माझी पुंजी संपत आलेली होती. शेवटचे फक्त वीस रुपयेउरलेले होते. म्हणून पुढच्या खर्चासाठी पैसे मागून आणायचे म्हणून मी मुद्दाम जायला निघालो होतो.दोन्ही कुटूंबीयानी मिळून माझ्यासाठी रेमंडची पॅन्ट आणि शर्ट शिवून आणलेला होता. मागच्या खेपेला मी गेलो होतो तेव्हा मी झोपल्यावर माझ्या पॅन्टशर्टची मापं त्यानी घेतलेली