रिव्हॉल्व्हर - प्रकरण 10

  • 231
  • 114

प्रकरण १०पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात बसला असतांना त्याला कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगली चा फोन आला. कार्तिकच्या ऑफिसात काहीतरी गंभीर गोष्टी घडल्याचं लक्षात आलं होतं तिच्या. पाणिनीने नेमके काय झालाय असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की वेगवेगळ्या दुरुस्त्या करणासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी एखाद्या कंपनीला चेक ने पेमेंट केल्याचं दिसतंय पण नेमकं काय काम दिलं होतं किंवा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिलेलीच नव्हती.खर्चाच्या तपशिलाची चलने पण बरोबर नाहीत म्हणजे चलनावर तपशील भरताना मोघम भरला गेलाय. पाणिनने तिला सांगितलं की यात फार गंभीर असेल काही वाटत नाही.मृण्मयीने संबंधित कंपनीला फोन लावावा आणि त्यांनी कोणत्या