प्रकरण ६पाणिनी कुमार कामतच्या सेकण्ड हँड कार विक्रीच्या शो रूम मधे आला.लगेच त्याच्या मागे तिथले सेल्स मन लागले.“ मला गाडी खरेदी किंवा विक्री करायची नाहीये.कामतला भेटायला मी आलोय.” पाणिनी म्हणाला. तरीसुद्धा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.त्यांना भीक न घालता कामत च्या केबिन मधे पाणिनी आला. “ मला तुझ्याशी महत्वाचं आणि तातडीने बोलायचंय. जिथे आपल्यात कोणीच व्यत्यय आणणार नाही.तुझ्या या सेल्स मेन नी मला वैताग दिलाय.त्यांना कटवायचा काही मार्ग नाही का? ” पाणिनीने विचारलं.“ एकच उपाय आहे.तुझी कार विकायची.” कामत म्हणाला. त्याने पाणिनी बरोबर आलेल्या सेल्समन ला सांगितलं की या पाणिनी पटवर्धन ची गाडी बाहेर घेऊन जा चालवून बघा.आणि आपण