बी. एड्. फिजीकल भाग 3 एकमेकांशी बोलताना काहीजण सहजावारी पण कळवळ्याने म्हणायचे, “ह्ये काळ्या बिचारं हितं काय जगत न्हाय गड्या.....” पण दोनचार दिवस गेल्यावर मला त्या रुटीनमध्ये अवघड, जीवघेणं असं कधीही काही भासलं नाही. पहिल्या टर्ममध्ये सकाळच्या असेंब्लीत १०० जोर नी संध्याकाळी १५० बैठका काढायच्या असत. अर्थात हेआकडे म्हणजे सक्ती नसे. तेवढं न जमणारेवआणखी साताठ महाभाग होते. उलट मांडवे, घाटे, मुच्छड थोरात नी काझी यांच्या सारखे काहीपैलवान गडी हा व्यायाम कमी पडतो म्हणून रोज सकाळी उठून दोनशे जोर नी अडिजशेबैठका मारीत असत. मेस मधलं जेवण म्हणजे मात्र कहर होता.फुलके काही अर्धे कच्चे, काही करपलेले नी कडा