चाळीतले दिवस - भाग 10

  • 234

चाळीतले दिवस भाग 10.   कुठेतरी पार्ट टाईम का होईना नोकरी मिळावी म्हणून मी प्रयत्न करत होतो.भावाने आधार काढून घेतला तर आयुष्यात आपण काहीच करू शकणार नाही, शिकायची कुवत असूनही केवळ आर्थिक कारणाने आपल्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागणार अशा विचाराने मला रात्र रात्र झोप लागत नव्हती.खाण्यापिण्यात किंवा अभ्यासात लक्ष लागत नव्हते. मंडळाच्या पोरांच्यातही थांबावेसे वाटत नव्हते. संध्याकाळी जेवण उरकले की लगेच मी आणि मित्र बाळू बाहेर पडायचो.चालत चालत गोल्फ ग्राउंडवर एखादा खडक बघून बसायचो.त्या काळात बाळू नितनवरे हा एकमेव मित्र सावलीसारखा माझ्याबरोबर असायचा.मी मंडळाच्यावतीने सुरु केलेल्या वाचनालयात दररोज जाऊन सगळ्या वर्तमानपत्रातल्या नोकरीच्या जाहिरातीही बघायचो.जिथे माझ्यायोग्य वाटेल अशा ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करायलाही मी