नाते तुझे नी माझे अतिदक्षता कक्षाचे दार उघडून अरूण भावे आत आला. “सर सगळ्या फॉरमॅलिटीज पु-या झाल्या. साला गव्हर्टमेंट हॉस्पिटल मध्ये जायचा हा पहिलाच एक्सपिरीअन्स.. इथे ह्या सेक्शनला बीलघ्या... त्या सेक्शनमध्ये चलन पास करून घ्या... आर. एम्. ओ. ची साईन घ्या...मेट्रनची नोट घ्या...डेडली एक्सपिरीअन्स काऊंटरवरच्या क्लार्कने हा सगळा चक्रव्यूह वर्णन करून सांगितला तेव्हा डिस्चार्ज मिळवणं ही ‘मेरे बस की बात नही’ असंच मीमनात म्हटलं होतं... पण गॉडब्लेस... मेट्रनऽऽ काय बरं त्यांचं नाव... हांऽऽफर्नांडिस