बरसुनी आले रंग प्रीतीचे - 30

  • 768
  • 321

"सर इथे पुढे एका दुकानाच्या cctv मध्ये van पास होताना दिसतेय... नंबर मिळालाय ..."गार्ड "ट्रेस कर... कुठेय बघ ..."ऋग्वेद "बघतोय सर .."गार्ड लॅपटॉप वर काहीबाही कटर होता.... इकडे ऋग्वेद चा जीव वर खाली होत होता... "मिळालं सर.. गोडाऊन एरिया ..."गार्ड ने बोलायची फुरसत कि ऋग्वेद ने गाडी सुरु केली... एकदम फास्ट ड्राइव्ह करत तो तिथे पोहचला... पण अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते.... त्याच्यामागोमाग गार्ड आले त्यांनी सगळ्यांनी टॉर्च लावले त्या पूर्ण एरिया मध्ये सगळी मांस पसरली... "तू...?.."प्रणिती ला शुद्ध आली तेव्हा तिला खुर्चीला बांधलेलं होत... ती सुटण्यासाठी धडपड करतच होती कि समोरून एक मास्क घातलेली मुलगी आली तिने प्रणिती समोर आपला मास्क काढला.... ती दुसरी