आर्या... ( भाग ७ )

   डॉक्टरांनी आर्या आणि आर्याचा हा जन्मतः असलेला आजात याबद्दल श्वेता आणि अनुराग यांना सविस्तर माहिती दिली .  त्यांनी ज्या परीक्षेची तयारी केली होती ती परीक्षा आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती . पण या वेळेस त्या दोघांनी ही मनाची तयारी करून समोर आलेला पेपर स्वीकारला होता.  डॉक्टरांनी सांगितल्या माहिती बद्दल श्वेता आणि अनुराग ने त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी तयार झाले .श्वेता ही आता आर्या साठी स्वतःला कठोर बनवत होती आणि बऱ्यापैकी ती स्वतःला सावरुन हुशार झाली होती . आर्या आता हळू हळू नवनवीन हालचाल करू लागली . तिला आता बघता 9 महिने झाले होते . पण