चाळीतले दिवस भाग 9. माझे बंधू कुवेतवरुन बऱ्यापैकी पैसे कमावून आले होते.त्या काळी त्याचे बँकेचे खाते वगैरे नव्हते त्यामुळे तिकडून आणलेले दोन अडीच लाख रुपये घरातल्या बॅगेतच ठेवले होते. त्याने येताना एक मोठा कॅसेट प्लेअर आणला होता.1979-80च्या त्या काळात आमच्या घरात पॅनासॉनिक कंपनीचा टेपरेकॉर्डर असणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती.त्याने एक भारीतला कॅमेराही आणला होता,कॅमेरा रोल टाकून ब्लॅक व्हाईट फोटो त्यात निघायचे.लवकरच मी टेपरेकॉर्डर आणि कॅमेरा हाताळायला शिकलो. माझ्यासाठी आण्णाने तिकडून तीन चार टी शर्ट आणले होते.एक रिको कंपनीचे मोठ्या निळ्या डायलचे घड्याळही मला मिळाले.आयुष्यात तेव्हढे भारी कपडे आणि घड्याळ मी प्रथमच वापरू लागलो.कॉलेजला जाताना मी ते इंपोर्टेड कपडे आणि