अनुबंध बंधनाचे.....( भाग ३५... )पुढचे काही दिवस ते दोघे अधुन मधुन भेटत असतात. एप्रिल महिन्यात प्रेम त्याच्या गावी जाऊन येतो. अंजली पण तिच्या मॉम सोबत तिच्या आज्जीकडे गोव्याला जाऊन येते. तिचे आता बारावीचे वर्ष असते, जुन महिना चालु झाला होता. थोड्याच दिवसात तिचे कॉलेज चालू होणार होते. आणि प्रेमचा वाढदिवस पण जवळ आला होता. त्या आधी ते दोघे एकदा भेटले....प्रेम : अंजु...! तुझं हे वर्ष खुप महत्वाचं आहे. थोड्या दिवसांनी कॉलेज चालू होईल. अंजली : अच्छा....! म्हणजे नवीन नियम, अटी...! हो...ना...! प्रेम : अरे...! मी काय बोलतोय ते तरी आधी ऐकुन घे. अंजली : मला चांगलं माहीत आहे तू काय बोलणार आहेस