भाग्य दिले तू मला ...... भाग -१०

  • 780
  • 261

"तुझ्यासोबत बदल घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्याची गरज नव्हती.... मी हेलग्न केलं ते हि तुझ्यासाठी .... पण हे कदाचित तुला नाही कळणार ... आणि मी सांगू शकणार नाही.. तुला..."तो स्वतःशीच म्हणाला... "बॉस ... निघायचं ना..."रॉकी म्हणाला तसा.. तो खाली उतरला आणि मागे जाऊन बसला.... रॉकी हि पुढे बसला.... ड्रायव्हर जो मागच्या गाडीत होता तो ड्रायव्हींग सीट वर जाऊन बसला.... आणि गाडी धुराळा उडवत तिथून निघून गेली....नानंदिनी साठी ठेवलेला ड्रायव्हर आणि गाडी तिथेच उभार होते... सोबत बॉडीगार्ड कुणाला समजणार बारकाईने निरीक्षण करत होते.... पण या सगळ्यात दोन डोळे असे हि होते... यांनी आताच नंदिनी ला त्या भल्या मोठ्या पॉश गाडीतून उतरताना पाहिलं