"शौर्य नाश्ता..."मॉम त्याची भरलेली प्लेट पाहून म्हणाल्या "पॉट भरलं माझं.."तो म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला.... "आरा ह्याला काय झालं.... "नंदिनी मनातच म्हणाली... "नंदिनी .. जा तुम्ही पण आवरा ... परत शौर्य घाई करतील... आणि ड्रेस च घाला.... साडीत त्रास होतो ना तुम्हाला ..."मॉम म्हणाल्या आणि नंदिनी ने मनातच देवाचे आभार मानले ... एवढी छान सासू दिली म्हणून... "हो मॉम,..."नंदिनी हसत म्हणाली आणि ती हि उठून रूममध्ये गेली.... आता पुढे .... शौर्य स्टडी रूममध्ये गेला तेव्हा 'पपा खिडकीतून बाहेर पाहत होते.... तो त्याच्या मागे जाऊन उभा राहिला... "पप्पा .."त्याने आवाज दिला तसे त्यांनी मागे वळून पहिले .... आणि स्टडी रूममध्ये असलेल्या सर्वात मोठ्या चेअर वर जाऊन