इकडे लॅपटॉप च्या स्क्रीन वर तो तिला रडताना पाहून त्याच्याही नकळत त्याच्या हृदयात कालवाकालव झाली ... पण दुसऱ्याच क्षणी तो परत निर्विकार झाला... त्याने हि मग लॅपटॉप वरच्या cctv बंद केला.... त्याच आयुष्य काहीच दिवसात पूर्ण बदललं होत.... जिचा तिरस्कार करत होता... तिलाच स्वतःचा कायमची सामील करून घेतलं होत... त्याला धड तिच्यावर राग हि काढता येत नव्हता..... आणि प्रेम... ते थोडं अशक्यच होत.... त्याने टेबलावर ठेवलेला वाईन उचलला आणि तोंडाला लावला.... त्याच्या डोक्यात सध्या काय सुरु होत ते... फक्त त्यालाच माहित होत.... आता पुढे ...... रात्र झाली तसा नंदिनी च्या पोटात भीतीने गोळा आला... कारण दिवसभर तो रूममध्ये नसला तरी ... आज आणि