चाळीतले दिवस भाग 8 माझ्या वहीनी त्यांच्या तीन मुलांना घेऊन माहेरी रहात होत्या.मोठा पुतण्या लोणंदला नव्यानेच सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीत जायला लागला होता.मी माझाखिसा रिकामा झाला की पुणे स्टेशनवरुन मिरज पॅसेंजरमधे बसून लोणंदला वहिनींच्याकडे पैसे मागायला जात असे,तिथे सगळा कारभार भावाचे सासरे -भाऊंच्याकडे असायचा.‘वायफळ खर्च करू नको’ ‘अभ्यास कर’ असे उपदेश ऐकून त्यांच्याकडे एखादा दिवस राहून वीसेक रुपये घेऊन मी पुन्हा मिरज पुणे पॅसेंजर पकडून पुण्याला यायचो.या वीस रुपयात माझा महिन्याचा खर्च सहज निघायचा.सायकलच्या दोन तीन महिन्याच्या भाड्यासाठी वेगळे पैसे एकदम मागून घ्यायचो.एकंदरीत खर्चाला पैसे मिळवणे खूपच अवघड असायचे. आमच्या कॉलेजचे इलेक्शन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व्हायचे.इलेक्शनला आधीच्या वर्षांपर्यंत