जवळ जवळ अकरा वाजत आलेले... ऋग्वेद च काम संपलं तस त्याने आजूबाजूला नजर फिरवली ..... "कुठे गेली ती...?..."त्याने बेडरूम मध्ये सगळीकडे बघितलं पण प्रणिती कुठेच दिसली नाही ... धावतच खाली हॉल मध्ये आला तर ती सोफ्यावर अंग आकसून झोपलेली... "इथे का झोपलीय हि...?...."बेडरूम वर आहे हे माहिती नाहीय का....?..."त्याने डोळे फिरवले आणि तिला उचलून घेतलं .... एवढ्या दिवसात एक गोष्ट तर त्याच्या नक्कीच लक्षात आली होती... ती एकदा झोपली कि पुन्हा अजिबात उठत नाही.... अर्थात ते चंगळच होत... नाहीतर तिला समजलं असत ऋग्वेद तिला रोज उचलून नेतो तर तिला हार्ट अटॅक च यायचा .... तिला बेड वर झोपवून तो दुसऱ्या बाजूला.... पण अजिबात