Quotes by Nikhil Ingle in Bitesapp read free

Nikhil Ingle

Nikhil Ingle

@nikhilingle9674gmail.com3


प्रेम केले अति
तेथीची माझी झाली  माती ...!!
ठेवीला तुझ्यावर विश्वास
तेथीची झाला माझा घात ...!!
दिली तुला मोकळीक
तेथीची हरवले स्वातंत्र माझे ...!!
देवाहूनी पुजीले तुला
तेथीची माझा दगड झाला...!!
ह्रदयात ठेवीले तुला
तेथीची प्रेमाचा चुरा झाला...!!
सोन्यासारखी दिली किंमत
तेथीची माझी उतरली कळा...!!
जीवापैक्षाही घेतली काळजी
तेथीची पेटला वनवा मनी ...!!
चुक झाली उमजली मला
पायातली चप्पल पायात ठेवीली

Read More

Ekda yeon ja.........


कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा...
स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस
स्वप्नात का होईना एकदा येऊन जा...
हात रिकामा भासतोय मला
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा...
बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू
त्या गर्दीत भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ...
तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही
एकदा फक्त येऊन त्या वेड्या मनाला हे समजावून जा ...
फक्त एकदा येऊन जा...
फक्त एकदा येऊन जा ..

Nikhil.

Read More

अशावेळी आपणचं आपल्या मनाला आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
अशावेळी आपल्या मनाला आपणचं आवरायचं असतं....

परक्यापेक्षा आपलीचं माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,
एकमेकांच्या पाठीवर मग नजरे आडुन होतातं वार,
भळभळणाऱ्या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं
अशावेळी आपल्या मनाला आपणचं आवरायचं असतं

आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्ये
काला अधिकार आहे,
पण दुसऱ्याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,
आपल्यासाठी थोडं दुसऱ्यासाठी जगायचं,
जगण्याचं हे ध्येयं मनात आपणचं बनवायचं असतं,
अशावेळी आपणचं आपल्या मनाला आवरायचं असतं.

Read More