Quotes by Amit in Bitesapp read free

Amit

Amit

@mramit015


लढा अजून संपलेला नाही...!

वय झालं सव्वीस, खांद्यावर जबाबदारीचं ओझं आहे,
आई-वडिलांच्या डोळ्यांत स्वप्न, पण माझं नशीब अजून गोठलेलं आहे.

रात्र-रात्र जागून आम्ही पुस्तकांमध्ये आयुष्य घासतो,
पण सकाळी उठल्यावर कळतं, इथं प्रामाणिकपणाच फासावर टांगला जातो!

​रोज एक पेपर फुटतो, रोज आमची स्वप्नं विखुरतात,
खुर्चीवर बसलेले चेहरे मात्र निर्धास्त जगतात.

आम्ही ग्राउंडवर रक्त गाळायचं की अभ्यासाची पानं उलटायची?
सांगा साहेब, या गढूळ व्यवस्थेत आम्ही आमची लायकी कशी सिद्ध करायची?

​बापाच्या सुरकुतलेल्या हातांना आता विसावा द्यायचा आहे,
आईच्या कष्टाचं मला चीज करून दाखवायचं आहे.
बेरोजगारीचा हा शिक्का कपाळावरून पुसायचा आहे,
पण काही हातांना अजूनही आमच्या भविष्याशी खेळायचं आहे!

​तरीही...

​हार मानणं रक्तात नाही, खचणं स्वभावात नाही,
कारण अजूनही डोळ्यांत उद्याचा उजेड जिवंत आहे.
राखेतून उठणाऱ्या फिनिक्ससारखं पुन्हा उभं राहायचं आहे,
या व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचा हक्क मिळवायचा आहे.

​कारण स्वप्नं अजून जिवंत आहेत,
आणि लढा अजून संपलेला नाही...!

-अमित पवार

Read More

नुकतंच पाऊल टाकणारं, दुडूदुडू धावणारं बाळ...
धपकन पडतं,
कावरं-बावरं होऊन चौफेर नजर टाकतं.
​समोर बसलेली आई,
"काही झालंच नाही" असा अविर्भाव चेहऱ्यावर आणते,
आणि त्या निर्विकार हास्यावर,
विश्वास ठेवून ते पुन्हा उठतं...
रडव्या चेहऱ्यानेच एक किलकारी भरतं,
आणि पुन्हा पळायला लागतं.
​आईकडून मिळालेला तो 'खोटा' विश्वास,
त्याला पडण्याची भीती उरू देत नाही;
उलट, स्वतःच्या चिमुकल्या पायांवर
मोठं धाडस करण्याचं बळ देतो.
​अशीच काहीशी अवस्था आजही जाणवते...
बाळाच्या आईसारखेच,
खोट्या विश्वासाचे अनेक मुखवटे
हसऱ्या नजरेने रोखून बघताहेत.
​पण आज... आतलं बालमन प्रौढ झालंय,
आणि हे 'प्रौढ' होणं मनाला बोचतंय.
कारण आता समज आली आहे,
म्हणून या खोट्या मुखवट्यांवर विश्वास बसत नाही.
​तरीही, बालपण जपण्यासाठी
मी पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय—
त्या समोरच्या खोट्या मुखवट्यांवर नाही,
तर पुन्हा एकदा... स्वतःच्या पायांवर!

- अमित पवार

Read More