*कवी जन्मावा लगतो*
'असे ख-या ह्या कवीचा
धाक काव्य चोरट्याना,
"कवी जन्मावा लगतो
सांगा खोट्या भूरट्यानां"
'कवी धरणी अंगणी
सुंगधी पारिजातक,
"वरूणाच्या थेंबासाठी
कवी भूकेला चातक"
'कवी मोत्यांचा सागर
मधू अम्रूत घागर,
"कवी कलेचा जागर
हृद्यी रसिक आगर"
'कवी हर दुबळ्यांच्या
रक्तामध्ये भरे स्फूर्ती,
"सर्वांंगीन योग्यतेची
यशवंतीदायी किर्ती"
'कवी पंचशक्ती सार
सांगे शक्तीपूढे युक्ती,
'वसे अंगी भावविश्व
देई दुःखातून मुक्ती"
'काव्य मयुराचे नृत्य
लांडोरीला भुलविते,
"काव्य चिखली उमले
कमळाला फूलविते"
*कविराज*
*मा.डाॕ.अनिल सांगळे*
🏆🌧🇮🇳⛳👏📖✍*
🍂🍃🌸🍃🍂🌸🌿