।। निशब्द ।।
शतकातून शतक गेले
बोलता न बोलते झाले
दुय्यम स्थान मज दिले
निशब्द मी राहिले
वाचनातून झाली क्रांती
लिहिण्याने जग समोर गेले
एकविसाव्या शतकातही
माझे मी न राहिले
लहानपण शोषित गेले
जवानीला पाझर फुटले
शरीराचे लचके तूटता
माझे मी पण हरविले
कधी ? केव्हा ? का ?
प्रश्न मनात अन्नूत्तरीत राहिले
जिभेला वाचा फूटता
निशब्द मी राहिले
कवी : गितेश ल. किसान 🖊🖊🖊