तो आणी ती : जुन्या आठवणींचा अल्बम
" काय दडलंय रे नक्की या जुन्या आठवणींच्या अल्बममध्ये... का मन अजूनही तिथेच रमतंय. काळ, वेळ आणि माणसं सर्वच तर बदलीय मग का छळतो अजूनही तो जुन्या आठवणींचा अल्बम " बऱ्याच दिवसांनी whatss up वर तिचा msg खणाणला होता. एरवी सदैव तिच्या msg ची वाट पाहणारा तो.. आता मात्र त्या आठवणीच्या अल्बममधून बाहेर पडला होता. अलगद msg type करून तो म्हणाला
" जुन्या आठवणींचा अल्बम म्हणजे मनात त्या क्षणाचा असणारा गारवा, हृदयाच्या पटलावर कोरलेले विविध मनोहर सप्तरंग , जुन्या आठवणींचा अल्बम तुम्हाला जगण शिकवतो, तुम्हाला प्रेरणा देतो, त्यात रमून जाऊ नको फक्त त्याला अलवार स्पर्श कर .. त्याचा तुला तिटकाराही वाटणारा नाही आणि त्रासही होणार नाही " त्याच ते उत्तर वाचून तिच्या चेहऱ्यावर निखळ हास्य खुललं होतं. ती सुद्धा त्या जुन्या आठवणींच्या अल्बमातील पानांना अलवार स्पर्श करू लागली. यावेळी तिला तो जुन्या आठवणींचा अल्बम त्रासदायक वाटत नव्हता. 😊😊
Nikhil D