कोपभर चाय वांगडाक काय?
कोपभर चाय
तेचेवांगडाक सफेदधोप घावणे
चारतरी व्हये सोमते
कोपभर चाय
तेतूर भिजवलले गावठी फॉव
त्याची मजाच भारी राव
कोपभर चाय
सोबत गरम केलले शिळे वडे
खानाऱ्याच्या जीभेर रेंगाळतले
कोपभर चाय
तेतूर भिजवलेले चिरमुले
तुळशीच्या लग्नात जमा केलले
कोपभर चाय
तेतूर बुडवून खावचे पोळये
भुसुभुसू जातत कसले
कोपभर चाय
चुलीसमोर बसान पिऊची
नी धग कांभरुन घेवची
कोपभर चाय
इलल्या पावन्याक देवची
नी राखूचो तेचो मान
कोपभर चाय
नी अमुल बटर लावललो बिरेड
माझो असा लय फेवरेट
कोपभर चाय
वांगडाक खारी,बटर,बिस्कुटा
पॉटभर खावा
कोपभर चाय
दूध नसला तर फुटी पिवची
पन पिवची म्हंजे पीवचीच
कोपभर चाय
तेचेवांगडा मारलल्या गजाली
आसली तर वायच दे गे घरनी
---------गीता गजानन गरुड.