माझा गुरु मला कधी कळलाच नाही....
कारण माझा मी पणा, मी कधी सोडलाच नाही...
आकंठ बुडाले मी माझ्या अहंकारात,
त्याच्या प्रेमाचा झरा माझ्यापर्यंत पोहचलाच नाही..
कारण माझा मी ....
मी कधी सोडलाच नाही ..
जाणीव याची होता मनाला,
काय हरवले आपण उमगले तयाला...
लीन झाले आज गुरुचरणाला,
क्षमा करा या पामराला 🙏🙏...
डॉ. स्वाती अनिल मोरे