प्रिय .....✨ ,
आज सहज विचार आला तुला पत्र लिहायचा , तस तर मी रोजच बोलते तुझ्याशी. तरीही पत्रातून व्यक्त व्हावं वाटलं. काय म्हणू तुला मित्र, जीवलग, प्रियकर की आणखी काही ? खरंच कधी कधी कळतच नाही आपल्यातलं नातं नक्की काय आहे ?
तु नक्कीच माझा आहेस. पण कोण आहेस माझा ? आपल्यातल्या नात्याला काही नावंच नाही. नाव द्यावं वाटतं ही नाही. कारण, त्या भावना इतक्या सुंदर आहेत ना त्यांना टॅग लावून मला त्यांची सुंदरता, निखळता नाही मलीन करायची.
मी तर म्हणते नात्याला नावंच नसलेलं चांगलं आहे. कारण, नात्याला नाव भेटलं की एक अदृश्य चौकट तयार होते आणि ती चौकट तयार झाली की नात्यातला मोकळेपना नाहीसा होतो .
त्यापेक्षा मला हे निनावी नातंच ठीक वाटतं. तु माझा आहेस. ही भावनाच खूप सुंदर आहे. मग कशाला नको तो आटापिटा करू.
माझी बरीचशी मते तुझ्या मतांशी जुळत नाहीत. तरीही तू समजुन घेतोस मला. कारण, तुला मी जास्त महत्त्वाची वाटते बाकी गोष्टींपेक्षा, आणि हेच कारण आहे जे मला माझ्याही नकळत तुझ्यात गुंतवत जात. हो.. गुंतले आहे मी तुझ्यात. हे प्रेम आहे की नाही मला नाही माहीत. ना ही मला ते जाणून घ्यायचंय.
बस तू माझा आहेस, माझ्या सोबत आहेस. यातच मी समाधानी आहे. तु कधी पर्यंत सोबत असशील नाही माहीत मला, पण एक नक्की आहे. तु खुप खास आहेस आणि तुझ्या सोबत ची प्रत्येक आठवण खूप अनमोल आहे. तुझ्या सोबतचा संपूर्ण काळ माझ्या आयुष्यातला अवर्णनीय असा काळ आहे.
तुला दुखवायच नाही मला, काही चुकलं असेल तर माफ कर. बस आज तुझ्याशी या पत्रामार्फत व्यक्त व्हावं वाटलं. बाकी तुला काही मी इतक्यात माझ्या जाचातून मुक्त करत नसते, त्यामुळे काळजी करू नकोस.
तुझीच वेडी ...🌸